व्हॉट्स अ‍ॅपवर आता आकर्षक स्टीकर्सची सुविधा !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2017 02:33 PM2017-01-13T14:33:01+5:302017-01-13T14:33:01+5:30

व्हॉट्स अ‍ॅपने नुकतीच ताजी आवृत्ती सादर केली असून, त्यात जीआयएफ प्रतिमा शोधण्यासह स्नॅपचॅट या अ‍ॅपसारखे आकर्षक स्टीकर्स शेअर करण्याची सुविधा दिली आहे. या सुविधेत व्हॉटस अ‍ॅपवर आपण अत्यंत आकर्षक असे स्टीकर्स शेअर करू शकतो.

Voices app now features attractive stickers! | व्हॉट्स अ‍ॅपवर आता आकर्षक स्टीकर्सची सुविधा !

व्हॉट्स अ‍ॅपवर आता आकर्षक स्टीकर्सची सुविधा !

googlenewsNext
हॉट्स अ‍ॅपने नुकतीच ताजी आवृत्ती सादर केली असून, त्यात जीआयएफ प्रतिमा शोधण्यासह स्नॅपचॅट या अ‍ॅपसारखे आकर्षक स्टीकर्स शेअर करण्याची सुविधा दिली आहे. या सुविधेत व्हॉटस अ‍ॅपवर आपण अत्यंत आकर्षक असे स्टीकर्स शेअर करू शकतो. 
सध्या ट्विटर आणि स्नॅपचॅटवर अशा पध्दतीची सुविधा आहे. मात्र आपण आता हेच स्टीकर्स व्हाट्स अ‍ॅपवरील प्रतिमा आणि व्हिडीओजवर वापरू शकतो. एवढेच नव्हे तर युजर्स प्रतिमा आणि स्टीकरवर विविध रंगांमध्ये आपल्याला हवे ते रेखाटनही करू शकतात. तसेच व्हॉटस अ‍ॅपद्वारे जीआयएफ इमेज शेअर करण्यासाठी त्या जीफी वा तत्सम थर्ड पार्टी अ‍ॅपवर शोधाव्या लागत होत्या. आता मात्र व्हॉटस अ‍ॅपवरच ही सुविधा मिळणार आहे. याशिवाय कुणीही युजर आधी एक वेळेस फक्त दहा जीआयएफ प्रतिमा शेअर करू शकत होता. यात वाढ करण्यात आली असून, कुणीही आता एक वेळेस ३० जीआयएफ इमेज शेअर करू शकतो. 

Web Title: Voices app now features attractive stickers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.