भिंती बोलक्या करणारी पेंटिंग्ज

By Admin | Published: April 5, 2017 05:58 PM2017-04-05T17:58:01+5:302017-04-05T17:58:01+5:30

घर सजवायचं आहे म्हणून घराच्या रिकाम्या भिंती पेंटिंग्जनं भरायच्या असं नाही. पेंटिंग्ज लावताना आपल्या घराचं स्वरूप, त्यातला माणसांचा स्वभाव त्यांच्या आवडी निवडी

Wall paintings | भिंती बोलक्या करणारी पेंटिंग्ज

भिंती बोलक्या करणारी पेंटिंग्ज

googlenewsNext

- सारिका पूरकर - गुजराथी

घर सजवायचं आहे म्हणून घराच्या रिकाम्या भिंती पेंटिंग्जनं भरायच्या असं नाही. पेंटिंग्ज लावताना आपल्या घराचं स्वरूप, त्यातला माणसांचा स्वभाव त्यांच्या आवडी निवडी यांचा विचार व्हायला हवा. असं झालं तर पेंटिंग्जमुळे घर नुसतं सजत नाही तर निर्जिव वाटणाऱ्या भिंती बोलक्या होतात.


‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’ या ओळीप्रमाणे ‘घरसजावटीसाठी भिंतीवरी पेंटिंंग असावे’ ही संकल्पना वापरली जाते. कारण घर फक्त निवासाचं अन सजावटीचं साधन नाही. तर घर हे तुमच्या विचारांचं, व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंबही असतं. भिंतीवर हे पेंटिंग्ज लावतानाही काही कल्पकता दाखवली तर त्या भिंतीचा आणि पेंटिंगचा नूर खऱ्या अर्थानं खुलतो. यासाठी घरातल्या भिंतींवर पेंटिंग्ज लावताना काही बाबी लक्षात ठेवाव्या लागतात इतकंच.

1) मान्यवर चित्रकारांची चित्रं, बाजारातील रेडिमेड फ्रेम्स, घरी तयार केलेल्या कलाकृती हे जर भिंतीवर लावत असाल तर ज्या ठिकाणी आसनव्यवस्था असेल तेथे शक्यतो त्या आय लेव्हलवर लावल्या जातील याची काळजी घ्या. तसेच सूर्याची प्रखर किरणे, पाणी थेट त्यावर जाणार नाही याचीही दक्षता घ्यायला हवी.
2) पेंटिंग्ज जर सोफ्याच्या वरच्या बाजूला लावत असाल तर सोफ्यापासून 6 ते 12 इंच वर पेंटिंगचा तळाकडचा भाग यायला हवा.
3) विविध आकारातील चित्रं, कलाकृती ग्रूप करून एका ठिकाणी लावत असाल तर त्याच्या लूककडे लक्ष द्या. म्हणजेच जी मोठी चित्रं आहेत, ती डावीकडे, अथवा तळाशी राहू द्या, कारण आपल्या नजरेला डावीकडून उजवीकडे पाहण्याची सवय असते. जर एकाच आकाराची चित्रं असतील तर त्याची वजनाप्रमाणे मांडणी करा. जास्त वजनाचं चित्र मध्यभागी असू द्या.
4) बेडरूममध्ये पेंटिंग लावताना त्याला शक्यतो पर्सनल टच कसा देता येईल ते पाहावं. बेडरूममध्ये प्रवेश केल्यानंतर शांत, रिलॅक्स अनुभूती मिळायला हवी. म्हणून त्यानुसार चित्रांची निवड करावी.घरातला हॉल आपली आवड अभिरूची दाखवतो. त्यामुळे आपली आवड प्रतिबिंबित होणारी पेंटिंग्ज हॉलमध्ये लावावी.
5) पेंटिंग्ज लावताना घराची रचना कशी आहे, किती जागा उपलब्ध आहे, याचाही विचार करावा. फक्त मोकळ्या, मोठ्या भिंतींवरच चित्रं लावतात हा समज काढून टाकावा. दारे, खिडक्या यांच्यामधली, शेजारची जागा मोकळी असेल तर तेथेही चित्रं लावू शकता.
6) पुस्तकांच्या कपाटावर मध्यभागीही छानसंचित्र लावू शकता, त्यामुळे हे कपाटदेखील उठून दिसेल आणि ते सजीव भासेल.
7) एकापेक्षा जास्त चित्रं लावताना त्यांच्या फ्रेम्स ट्रॅडिशनल निवडा आणि एकाच रंगात रंगवून घ्या (काळा, पांढरा, तिपकरी) दिसायला ते फार सुंदर दिसतं.
8) भिंतीवर चित्रं , कलाकृती लावण्यापूर्वी त्या चित्रांचा, कलाकृतींच्या रंगांच्या कॉन्ट्रास्ट रंगाचा पट्टा कलाकृती लावण्याच्या जागेवर बॅकग्राऊंड म्हणून द्यावा. यामुळे चित्रं आणि भिंती उठावदार दिसतील. म्हणजेच चित्रात क्र ीम रंग असेल तर भिंतीवर लाल, जांभळ्या रंगाचा पट्टा देऊन घ्या. भिंतीचा लूक एकदम पालटेल!

 

Web Title: Wall paintings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.