वायफाय स्पीड वाढवायचाय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2016 03:15 PM2016-07-01T15:15:11+5:302016-07-01T20:45:11+5:30
इंटरनेट ही आज मानवी जीवनाची अत्यावश्यक गरज बनली आहे.
Next
विशेष म्हणजे युवा वर्ग तर याशिवाय कोणतेच काम करु शकत नाही. आॅफिस असो किंवा शॉपिंग प्रत्येक ठिकाणी इंटरनेट आवश्यक आहे. आपल्याकडे इंटरनेट कनेक्शन असेल व आपला प्लॅन चांगल्या स्पीडचा आहे. परंतु, तरीही स्पीड कमी आहे. ही स्पीड वाढविण्यासाठी, त्याकरिता या काही खास टीप्स आपल्यासाठी.
राऊटरची जागा : राउटर कुठे ठेवावे, याला अनेकजण महत्त्व देत नाही. परंतु, या जागेमध्ये थोडा बदल केला तर इंटरनेट स्पीड ही वाढू शकते. याकरिता राऊटरला थोड्या उंच जागेवरती ठेवावे. शक्यतो त्याच्या समोर कोणत्याच वस्तू ठेवू नये. त्याच्यासमोर वस्तू ठेवल्याने राउटरचा परफॉर्मन्स घटतो.
कॉक्रिट भित व धातूपासून दूर ठेवा : कॉक्रिटची भित व कोणत्याही धातूची वस्तू ही राउटरच्या परफॉर्मेन्सला खराब करु शकते. याकरिता धातूपासून राऊटर नेहमी दूर ठेवावा. तसेच राउटर व डिव्हाईसमध्ये कॉक्रिट भित असू नये.
रेडीओ व टीव्हीपासून दूर ठेवा :राऊटर नेहमी टीव्ही व रेडिओपासून दूर ठेवावे. टीव्ही व रेडिओही वायरलेसच्या संकेतानुसार काम करते.
माइक्र ोवेवमुळे स्पीड होते कमी : माइक्रोवेवेनने सुद्धा स्पीड स्लो होते. माइक्रोवेव सुद्धा 2.45 गीजाहटर्सच्या फ्रिक्वेंसीवर काम करतो. उत्सावानिमित्त आपण जी लाईटींगची सजावट करतो. परंतु, ती सुद्धा इलेक्ट्रॉमैग्नीटिक फिल्म बनू शकते. त्यामुळे राउटरला काम करण्यास अडचणी येतात.
वायफाय डिव्हाईस अपडेट कराव्या : लॅपटॉपमधील वायफाय डिव्हाईसला अनेकजण अपडेट करीत नाहीत. त्याममुळे इंटरनेट स्लो होते. याकरिता आपले राउटरला डिव्हाईससाठी प्रीफरेन्सला ठेवावे. यामुळे सुद्धा राउटरच्या परफॉर्मेसमध्ये सुधारणा होते.