​मोकळ्या मनाने दुसऱ्यांची स्तुती करणे ‘या’मुळे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2016 12:35 PM2016-08-20T12:35:26+5:302016-08-20T18:05:26+5:30

दोन कौतुकाचे शब्द बोलल्याने आपल्यातील चांगले गुण दिसतात.

'We' need to freely praise others | ​मोकळ्या मनाने दुसऱ्यांची स्तुती करणे ‘या’मुळे गरजेचे

​मोकळ्या मनाने दुसऱ्यांची स्तुती करणे ‘या’मुळे गरजेचे

googlenewsNext
वेळ पैशाने कंजुष असलेले चालेल पण योग्य वेळी योग्य माणसाची स्तुती करण्यात कमी पडू नये. ज्याने चांगले काम केले त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पडलीच पाहिजे. यामुळे केवळ समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्वासच नाही वाढत तर आपल्या विषयीदेखील अनेक चांगल्या बाबी इतरांना दिसून येतात. पण जसे की आपण पाहतो, फार कमी लोक असतात जे, मोकळ्या मनाने दुसऱ्यांची स्तुती करतात.

दोन कौतुकाचे शब्द बोलल्याने आपल्यातील पुढील चांगले गुण दिसतात-

१. टीम प्लेयर
आपल्या सहकाऱ्याने चांगले काम केले तर त्याचे श्रेय त्याला द्या. तुम्ही वरिष्ठ असाल तरी द्या. यामुळे सर्व सहकाऱ्यांमध्ये तुम्ही ‘टीम प्लेयर’ आहात असा संदेश जाईल.

२. इगो नसणे

दुसऱ्याने चांगले काम केले याचा अर्थ असा नाही होत की, तुम्ही खराब काम करता. केवळ इगो नसणारा व्यक्तीच दुसऱ्यांचे कौतुक करू शकते.

३. टॅलेंट हेरण्याची दृष्टी
दुसऱ्यांच्या कामाची स्तुती केल्यामुळे तुमच्यामध्ये इतरांचे टॅलेंट हेरण्याची दृष्टी आहे असा अर्थ होतो. 

४. आत्मविश्वास
ज्या व्यक्तीचा स्वत:च्या क्षमतांवर पूर्ण विश्वास असतो तो दुसऱ्यांचे कौतुक करायला कचरत नाही. उलट यामुळे तुमचा आत्मविश्वास झळकतो.

Web Title: 'We' need to freely praise others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.