हेवी लेहेंग्यासोबत असे प्रयोग करून तुम्ही हटके लूक मिळवू शकता!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 02:44 PM2018-09-07T14:44:29+5:302018-09-07T14:58:40+5:30
लग्न म्हटलं की, धावपळ, तयारी आणि मस्त आणि हटके कपड्यांची शॉपिंग. पण लग्नात घातलेला कपडे आपण एकदाच वापरतो.
लग्न म्हटलं की, धावपळ, तयारी आणि मस्त आणि हटके कपड्यांची शॉपिंग. पण लग्नात घातलेला कपडे आपण एकदाच वापरतो. सध्या लग्नामध्ये घालण्यासाठी किंवा नवरीचीही तिच्या लूकसाठी लेहंग्याला पसंती देण्यात येते. पण हा हेवी लेहेंगा आपल्याला इतर ठिकाणी वापरता येत नाही. आज जाणून घेऊयात अशा काही टिप्स ज्यांमुळे तुम्ही एकच लेहेंगा वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता.
लेहेंग्यावरील ब्लाउज किंवा टॉप बदलून वापरू शकता
जर तुम्ही एकदा लेहंगा घातला असेल तर त्यावर वेगळ्या ब्लाउज किंवा टॉप घालून पुन्हा वापरू शकता. हा पूर्णपणे नवीन लूक असेल. बॉटन-डाउन ब्लाउजसोबत लेहंगा परिधान शकता. यावर शर्टही वापरू शकता. लेहेंगा घालून त्यावर शर्ट इन करून घातलं तर एक क्लासी लूक मिळण्यास मदत होते.
अनारकली लूक
जर तुम्हाला हेव्ही लेहंगा घालणं शक्य नसेल तर त्यापासून तुम्ही एक वन पीस तयार करून वापरू शकता. लेहंग्याला फॅब्रिकच्या मदतीने ब्लाउजसोबत वापरू शकता. त्यामुळे अनारकली लूक मिळवण्यास मदत होईल.
जॅकटसोबत वेअर करू शकता
आपल्या लेहेंग्याचा लूक हटके करण्यासाठी त्याला फ्लोअर जॅकेट्ससोबत वेअर करा. त्यामुळे तुमचा लूक डिफ्रंट मिळेल.
दुप्पटा वापरा
जर तुमच्याकडे ब्रायडल दुप्पटा असेल तर याचा पुन्हा वापर करून तुम्ही हटके लूक मिळवू शकता. यासाठी एका प्लेन ड्रेसवर सिम्पल लेहंग्याचा वापर करून तुम्ही क्लासी लूक मिळवू शकता.
साडी सारखा वेअर करू शकता
तुम्ही ब्लाउज आणि दुप्पटा बदलून लेहेंग्याला साडीचा लूक देऊ शकता.