फॅशनेबल जीन्स घालताय?; पण पर्यावरणाचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 10:40 AM2024-04-07T10:40:23+5:302024-04-07T10:40:48+5:30
आपण एखाद्या दुकानातून नव्या फॅशनची जीन्स खरेदी करतो. कधी-कधी ती न आवडल्याने तशीच टाकून दिली जाते.
बदलत्या फॅशननुसार, कपड्यांमध्येही नवनवे ट्रेंड्स येतात. तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकही जीन्स पॅन्टला प्राधान्य देतात, परंतु तुम्ही घालत असलेल्या जीन्समुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत असल्याचे पुढे आले आहे. कदाचित हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ते खरे आहे. चीनमधील ग्वांगडाँग विद्यापीठाने केलेल्या संशोधनात ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
आपण एखाद्या दुकानातून नव्या फॅशनची जीन्स खरेदी करतो. कधी-कधी ती न आवडल्याने तशीच टाकून दिली जाते. ती जीन्स कशी आणि किती वेळात तयार केली जाते, ती तयार करताना पाणी व रसायनांचा वापर, कार्बन डायऑक्सॉइडचे उत्सर्जन तसेच निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा पर्यावरणावर किती परिणाम होतो, याचा आपण विचारही करत नाही.पारंपरिक जीन्सच्या तुलनेत एखाद्या फॅशनच्या जीन्समधून
९५-९९
टक्के अधिक कार्बन फूटप्रिंट तयार करतात.
२.५०
किलो कार्बन उत्सर्जन एक जीन्स तयार करताना होते.
११
पट पारंपरिक कपड्यांच्या तुलनेत जीन्समधून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण.
पारंपरिकच्या तुलनेत अधिक वापर
फॅशनेबल जीन्सचा वापर सध्या अधिक वाढला आहे. पारंपरिक पॅन्ट ही साधारणतः
१२०
वेळा घातली जाते. त्या तुलनेत जीन्स पॅन्ट ही सातपट अधिक वापरली जाते.
२.५०
किलो कार्बन उत्सर्जन हे एका कारने १० किमीच्या (सहा मिनिटे) प्रवासातून झालेल्या कार्बन उत्सर्जनाइतके आहे.