स्वागत करणारं प्रसन्न प्रवेशद्वार
By admin | Published: April 4, 2017 03:58 PM2017-04-04T15:58:21+5:302017-04-04T15:58:21+5:30
आपल्या घरात आलेल्या पै-पाहुण्यांचं स्वागत करायचं म्हणजे हार अन सुगंंधी अत्तराचे फवारे मारायला लागतात असं नाही. तर आपल्या घराचं प्रवेशद्वारही आलेल्या पाहुण्यांचा मूड आनंदी करू शकतो.
आपल्या घरात आलेल्या पै-पाहुण्यांचं स्वागत कसं प्रसन्न झालं पाहिजे. पण स्वागत करायचं म्हणजे हार अन सुगंंधी अत्तराचे फवारे मारायला लागतात असं नाही. तर आपल्या घराचं प्रवेशद्वारही आलेल्या पाहुण्यांचा मूड आनंदी करू शकतो.
घरात पाऊल ठेवल्यावर पाहुण्यांनाच काय तर स्वत:लाही प्रसन्न वाटलं पाहिजे यासाठी घराचं प्रवेशद्वार हटके पध्दतीनं सजवण्याच्या सोप्या युक्त्या आहेत.
1) मॉडर्न लूक देण्यासाठी प्रवेशद्वार ते दिवाणखाना (घर मोठे असेल तर) या भागात शक्यतो ब्राईट कलर्स, आकार असलेले टाईल पॅटर्न रग अंथरा.
2) घरात आतल्या बाजूनं जिना असेल (रो हाऊस, बंगलोमध्ये सहसा असतोच) तर त्याच्या पायऱ्या कलरफुल करता येतात. त्यासाठी पायऱ्यांवर तुमच्या आवडीचे रंग देऊ शकता. त्यासाठी ब्राईट कलर्स निवडले तर फ्रेश लूक मिळेल. जिन्याचे ग्रिल प्युअर व्हाईटमध्ये रंगवले तर आणखी उठाव मिळतो.
3) प्रवेशद्वारालगत, समोर विविध आकारातील वॉल पीस (आरसे, फ्रेम, घड्याळे) यांचा वापर करु न भव्यता आणता येते.
4) प्रवेशद्वारापाशी एखादा ट्रॅडिशनल लाकडी टेबल् ठेवून त्यावर मोठ्या आकारातील फ्लॉवर वासे ठेवूनही कंटेपररी लूक मिळवता येतो.
5) प्रवेशद्वार प्युअर व्हाईट, पिवळ्या, क्र ीम, आकाशी, लालसर, तपकिरी, डार्क ग्रे रंगात रंगवून मॉडर्न लूक देता येतो. त्यासाठी प्रवेशद्वारही तसंच असायला हवं. (पारंपरिक लाकडी कोरीव काम केलेले नको).
6) प्रवेशद्वारासमोरील भिंतीवर वॉलपेपरचा वापर करु नही खूप इनोव्हेटिव्ह लूक देता येतो. गडद रंगांचे, फ्लोरल प्रिंटचे वॉलपेपर वापरले तर बोल्ड लूक मिळतो. पिवळ्या, गुलाबी रंगाचे वॉलपेपर वापरले तर सॉफ्ट लूक मिळेल.
7) प्रवेशद्वार ते दिवाणखाना या भागाला लेयर्ड लूक ( थरावर थर या स्वरूपाचं) देण्यासाठीपुस्तके, लॅम्प्स, भिंतीवर फ्रेम्स, मोठे फ्लॉवर वासे यांची सुंदर रचना करु शकता.
8) प्रवेशद्वारासमोरच रूम डिव्हाइडर, पार्टिशन्स (जे अनेक प्रकारात येतात) ते वापरूनही नजाकत वाढवता येते.
9) जिन्याभोवतीच्या भिंतीवरही फ्रेम्स, वॉलपेपर लावून, गडद रंग देऊन सजवता येते. स्ट्रिप्ड फिकट पिवळ्या रंगाच्या वॉलपेपरनं त्या भिंतीला सनशाईन इफेक्ट देता येतो.
10) सॉफिस्टिकेटेड लूकसाठी प्रवेशद्वारावर विविध प्रकारच्या, टेक्श्चरच्या काचांचा उपयोग करता येतो.
- सारिका पूरकर - गुजराथी