​काय आहे 4जी टेक्नॉलॉजी..?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2016 06:29 PM2016-11-16T18:29:02+5:302016-11-16T18:33:07+5:30

सध्या तंत्रज्ञानाचे युग असून 1 जी पासूनची भरारी 4 जी पर्यंत घेतली आहे. आज सर्वत्र 4 जीची चर्चा सुरु आहे. मग नेमकं काय आहे 4 जी टेक्नॉलॉजी याबाबत आजच्या सदरात जाणून घेऊया...

What is 4G technology? | ​काय आहे 4जी टेक्नॉलॉजी..?

​काय आहे 4जी टेक्नॉलॉजी..?

Next
्या तंत्रज्ञानाचे युग असून 1 जी पासूनची भरारी 4 जी पर्यंत घेतली आहे. आज सर्वत्र 4 जीची चर्चा सुरु आहे. मग नेमकं  काय आहे 4 जी टेक्नॉलॉजी याबाबत आजच्या सदरात जाणून घेऊया...

1 जी
4 जी टेक्नॉलॉजी ही मोबाइल टेक्नोलॉजीची चौथी पीढी म्हणजे जनरेशन होय. चौथी जनरेशन यासाठी की, याअगोदर एका पाठोपाठ असे तीन जनरेशन येऊन गेले आहेत. मग 1 जी अगोदर काय होते असा प्रश्न नक्कीच पडला असेल. तर या अगोदर होता लॅँडलाईन. 1 जी टेक्नॉलॉजी पासूनच वायरलेस टेलिफोन म्हणजेच मोबाइलचा (भ्रमणध्वनी) परिचय जगाशी झाला. मात्र अनालॉग सिग्नलवर आधारित 1 जी टेक्नॉलॉजीमध्ये खराब आवाज येणे, मोबाइल हॅण्डसेटचा मोठा आकार आणि वजन तसेच डाटा स्पीड अतीमंद अशा समस्या होत्या. 

2 जी
1 जी टेक्नॉलॉजीमध्ये येणाऱ्या समस्यांचे निराकरण 2 जी टेक्नॉलॉजीमध्ये करण्यात आले. ही टेक्नॉलॉजी डिजीटल सिग्नलवर आधारित असून याद्वारे आपण फोनकॉल सोबतच इंटरनेटचाही आनंद आरामात घेऊ शकतात. ही टेक्नॉलॉजी आल्यानंतर मोबाइल युगात जणू क्रांतीच झाली. आता सुद्धा भारतात बहुतांश लोक 2 जीचाच वापर करीत आहेत. मात्र 2 जीचा डाटा ट्रान्सफर स्पीड 236 kbps आहे,  ज्यात पिक्चर मॅसेज, टेक्स मॅसेज आणि मल्टीमीडिया मॅसेज आरामाने पाठविता येतात. मात्र व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉन्फ्रे सिंग आणि मोबाइल टीव्ही यात 2 जी अयशस्वी ठरली.    

3 जी
2 जी नंतर थर्ड जनरेशन म्हणजेच 3 जी आले.  यात डाटा ट्रान्सफर स्पीड 21 mbps आहे, जी 2 जीच्या तुलनेने खूप चांगली आहे. याने मोबाइल यूजर्ससाठी व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग आणि मोबाइल टीव्ही या सुविधा सहज उपलब्ध मिळू लागल्या. 3 जी आल्यानंतर मोबाइल आणि लॅपटॉपसाठी स्पेशल आॅनलाइन टीव्ही अ‍ॅप्लिकेशन आले, सोबतच व्हिडिओ कॉल करण्यासाठी फोनमध्ये फ्रं ट फेसिंग कॅमेरादेखील आला. आणि या कॅमेराचा उपयोग सर्वचजण सेल्फीसाठीदेखील करु  लागले. 

4 जी
भारतीय नागरीक 3 जीचा आनंद घेत असतानाच 4 जीचा धमाका सुरू झाला. ही टेक्नॉलॉजी 3 जीच्या तुलनेने 5-10 पटीने जलद आहे. कारण याच्यात इंटरनेटचा स्पीड 100 mbps ते 1 gbps पर्यंत आहे. यामुळे स्मार्टफोनवर विना बफरिंग टीव्ही पाहणे, व्हिडिओ कॉल करणे, चित्रपट, सॉफ्टवेअर, गेम्स डाउनलोड करणे आदी सुविधा अत्यंत जलद गतीने मिळू लागल्या. आपण जसे कंप्युटरमधून एखादी फाईल कॉपी करतो अगदी त्याच पद्धतीने. तर मग 4 जी टेक्नॉलॉजीचे स्वागत करुया आणि मनमुराद आनंंद लुटूया...

Web Title: What is 4G technology?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.