​लॅपटॉपवर पाणी पडल्यास काय कराल ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2016 04:36 PM2016-11-17T16:36:48+5:302016-11-17T16:36:48+5:30

बऱ्याचदा लॅपटॉपवर काम करताना चुकीने त्यावर चहा किंवा पाणी पडते. यामुळे आपला लॅपटॉप खराब होऊ शकतो. खालील काही टिप्स दिल्या असून, त्याद्वारे आपण प्रथमोपचार करून आपल्या लॅपटॉपला खराब होण्यापासून वाचवू शकाल.

What to do if you get water on a laptop? | ​लॅपटॉपवर पाणी पडल्यास काय कराल ?

​लॅपटॉपवर पाणी पडल्यास काय कराल ?

googlenewsNext

/>बऱ्याचदा लॅपटॉपवर काम करताना चुकीने त्यावर चहा किंवा पाणी पडते. यामुळे आपला लॅपटॉप खराब होऊ शकतो. खालील काही टिप्स दिल्या असून, त्याद्वारे आपण प्रथमोपचार करून आपल्या लॅपटॉपला खराब होण्यापासून वाचवू शकाल. 
* लॅपटॉपवर जसेही द्रव पदार्थ पडल्यास तात्काळ त्यातून माइक, वायरलेस कार्ड, डाटा केबल आदी वस्तू वेगळ्या करा. 
* पाणी किंवा चहा पडल्यास ते आतील डिवाइस पर्यंत पोहोचू नये म्हणून लॅपटॉपला तत्काळ उल्टा करा. 
* त्यानंतर टिश्यू पेपर घेऊन लॅपटॉप स्वच्छ करा. 
* आपल्या लॅपटॉपच्या ‘कीज’ रिमुव्हेबल असतील तर त्या लगेच वेगळ्या करा. 
* लॅपटॉपचा कव्हर स्क्रू ड्राइवरने खोलून आत गेलेले पाणी बाहेर काढा. 
* आता टिश्यू पेपर किंवा ईयरबडच्या माध्यमातून सर्किट स्वच्छ करा. 
* रॅमला बाहेर काढून त्यालाही टिश्यूने साफ करा. 
* त्यानंतर हेयर ड्रायरने लॅपटॉप कोरडा करा. लक्षात ठेवा की, हेयर ड्रायरला लो हीट वर ठेवा. 
* आता रॅम आणि कव्हर पुन्हा लावा. 
या टिप्स वापरु न आपण आपल्या लॅपटॉपला खराब होण्यापासून वाचवू शकता. जर यामुळेही लॅपटॉप सुरू झाला नाही तर मात्र मॅकेनिकला दाखवा

Web Title: What to do if you get water on a laptop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.