मुलांना काटकसर शिकवायची तर काय कराल?

By admin | Published: July 1, 2017 04:57 PM2017-07-01T16:57:11+5:302017-07-01T16:57:36+5:30

मुलांना पैशाची किंमत नाही म्हणून पालक कटकट करतात, पण पैशाचं मोल त्यांना तुम्ही शिकवता का?

What to do if you want to teach children a lot? | मुलांना काटकसर शिकवायची तर काय कराल?

मुलांना काटकसर शिकवायची तर काय कराल?

Next


-नितांत महाजन


घरोघरची एकच रड, आजकालच्या मुलांना पैशांची काही किंमत नाही. त्यांना पैशाचं मोल कळत नाही. सतत हट्ट करतात. हजार-दोन हजार रुपयांची वस्तू सहज मागतात. ती मोडतात. फेकतात. या कार्ट्यांना कसं शिकवणार पैशाचं महत्व? स्वत: कमवायला लागल्यावरच येईल अक्कल. असा घरोघरचा त्रागा तसा काही नवीन नाही. पण आपल्या मुलांना पैशाचं मोल समजावं, निदान त्यांच्या हाताला बचतीची सवय लागावी, त्यांना हिशेब यावा, व्यवहार कळावा म्हणून आपण काय करतो? काही नाही. म्हणूनच काही गोष्टी घरच्याघरी करा. मुलं हिशेब शिकतील आणि पैशाचं मोलही त्यांना समजेल.
१) पैसे वाचव, असं मुलांना सांगितलं तर ते का ऐकतील. नुस्ते पिगी बॅँकेत पैसे भरुन ठेवण्यात त्यांना काहीही मजा वाटत नाही. त्यामुळे मुलांना काहीतरी लक्ष्य ठरवू द्या. म्हणजे सेव्हिंग गोल. कशासाठी पैसे वाचवायचे हे ते ठरवतील. ते पालकांनी ठरवू नये. म्हणजेच कुठं पिकनिकला जायचं, सायकल घ्यायची, नवीन गेम, नवीन पुस्तकं काहीही. मुलं म्हणतील ते, त्यासाठी त्यांनी अमूक इतके पैसे साठवले तर उरलेले पैसे आपण घालू असं प्रॉमिस पालकांनी द्यावं. त्यासाठी मुलं हळूहळू बचत करायला, तात्कालीक मोह बाजूला ठेवायला शिकतील.

२) बजेट काय?
म्हणजे जी गोष्ट त्यांना हवी आहे, त्यासाठी बजेट काय? त्याची माहिती मुलांनाच काढू द्या. त्यांना बजेट समजून घेवू द्या. त्यासाठी बचत कशी करणार, याचा प्लॅन त्यांनाच करू द्या. मागितली तर मदत करा.
३) बचतच नाही तर इन्व्हेस्ट कसं करतात हे सांगा. घरातल्या घरात त्यांना तुमच्याकडे पैसे इन्व्हेस्ट करु द्या.
४) बँकेत अकाऊण्ट उघडू द्या. त्यात त्यांना पैसे टाकू द्या.
५) बाजारात जाऊ द्या. थोडं वाणसामान, भाजी आणू द्या. हिशेब विचारू नका. ते देतील हिशेब. तो समजून घ्या. चुकलं तर रागावू नका. चूक सांगा फक्त.
६)द्यायला शिकवा. म्हणजे त्यांच्या पैशातून त्यांना कुणाला काही गिफ्ट घेवू द्या. किंवा मदत करू द्या.

Web Title: What to do if you want to teach children a lot?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.