काय सांगता? २०८०पर्यंत कॉफी होणार लूप्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2016 04:54 PM2016-09-06T16:54:49+5:302016-09-06T22:24:49+5:30

‘द क्लायमेट इन्स्टिट्यूट’च्या नव्या अहवालानुसार ग्लोबल वार्मिंग जर सध्याच्या वेगाने अशीच वाढत राहिली तर २०८० सालापर्यंत जगातून कॉफीचे अस्तित्व नष्ट होऊन जाईल.

What do you say? Coffee will loot till 2080! | काय सांगता? २०८०पर्यंत कॉफी होणार लूप्त!

काय सांगता? २०८०पर्यंत कॉफी होणार लूप्त!

Next
फीचा घोट घेतल्याशिवाय ज्यांची सकाळ होत नाही अशा जगभरातील कॉफीप्रेमींसाठी फार धक्कादायक बातमी आहे. ‘द क्लायमेट इन्स्टिट्यूट’च्या नव्या अहवालानुसार ग्लोबल वार्मिंग जर सध्याच्या वेगाने अशीच वाढत राहिली तर २०८० सालापर्यंत जगातून कॉफीचे अस्तित्व नष्ट होऊन जाईल.

वाढत्या तापमानामुळे कॉफीचे उत्पादन घेणाऱ्या जमिनीची क्षमता घटून कॉफीची शेती करणे अशक्य होणार आहे. एवढेच कशाला, अगदी २०५०पर्यंतच जगातील अर्धे कॉफीचे मळे निरुत्पादक होणार असल्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. याचा अर्थ की तुमच्या आवडीचे कॉफी फ्लेवर चाखण्याचे आता मोजकेच काही वर्षे शिल्लक राहिले आहेत. स्पष्ट सांगायचे तर फक्त ६४ वर्षे!

तुम्हाला जर वाटत असेल की अजून बराच वेळ आहे तर तसे नाही. कारण येणाऱ्या काही वर्षांमध्येच कॉफीच्या मूळ चवीमध्ये होणारे बदल तुम्हाला जाणवतील. तसेच उत्पादन घटल्यामुळे कॉफीचे दरदेखील गगनाला भिडतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही. बरं तुम्हाला कॉफीविषयी फारसे प्रेम जरी नसले तरी हा मुद्दा सर्वांसाठीच चिंता करण्याचा आहे.

कॉफी इंडस्ट्री ही जगातील सर्वात मोठ्या व्यवसायांपैकी एक आहे. कॉफी नष्ट झाली तर लाखो लोकांना बेरोजगार व्हावे लागणार. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे.

Web Title: What do you say? Coffee will loot till 2080!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.