रोज सतत वापरतो ते ‘इमो’ काय सांगतात?
By admin | Published: July 17, 2017 03:35 PM2017-07-17T15:35:11+5:302017-07-17T15:35:11+5:30
आज जागतिक इमोजी डे साजरा होतोय; आपल्या व्यक्त होण्यात ही चित्र कुठून आली, याची ही एक झलक!
- शिल्पा मोहिते
हसणारे, चिडवणारे छोटे छोटे इमोटिकोन किंवा स्मायली आज तुमच्या आमच्या दैनंदिन भाषेचा अविभाज्य घटक झाले आहेत. सकाळी गुड मॉर्निंग बरोबर येणारा सूर्य असो किंवा मुलीच्या हट्टाला कंटाळून दिलेला स्ट्रेट फेस, मित्राच्या जोक वर दाद म्हणून दिलेला खिडळणारा स्मायली असो वा कुणा खास व्यक्तीला दिलेलं चुंबन आणि हार्ट्स. या स्मायली किंवा इमोटिकॉन्स ने आपली चॅट विंडो आनंदी आणि थोडी जास्तच रंगीबेरंगी केलेली आहे. पण तुम्हाला आठवतोय का पहिला वहिला एमोटिकोन ? जर तुम्ही इंटरनेटच्या सुरूवातीच्या काळात संगणक वापरला असेल तर तुम्ही कदाचित आजही :)
हे चिन्ह स्मायली म्हणून कधी कधी वापरत असाल. या चिन्हाचा आणि तात्पर्यानं मॉडर्न स्मयलीचा जनक होता स्कॉट फॅहलमन यांनी साधारण १९८२ साली पाठवलेला हा मेसेज.
पण या वरवरच्या नफानुकसाना पलीकडे एमोटिकोनचा काही उपयोग होऊ शकतो का ? दिवसेंदिवस बिझनेसेस इमोटिकॉन्सचा वापर विविध ब्रॅँडिंग आणि मार्केटिंगच्या उपक्र मात करताना दिसत आहेत. आय होपसारख्या काही कंपनीनी आपले लोगोज स्मायली सारखे रीब्रॅण्ड केलेत तर डॉमीनोजने आॅर्डर प्रोसेस स्मायलीमय करून टाकली आहे. मार्केटींगचं विश्व जास्तीत जास्त मार्केटर आणि कन्झ्यूमरच्या भावनिक नातेसंबंधावर अवलंबुन राहायला लागलं आहे, त्यामुळे सगळ्यांनीच आता या इमोटिकॉन्सच्या वापराच्या दिशेनं धाव घेतली आहे.
काळासोबत कम्युनिकेशन्सची, संवादाची साधनं बदलली. आता तर आपण बोलण्याइतकंच व्हॉट्सअॅपवर लिहून संवाद साधतो आहोत. त्यात या स्मायली सर्रास वापरतो. आपल्याला जे म्हणायचं ते या स्मायली पोहचवतात असं आपल्याला मनापासून वाटतंही अनेकदा.
अश्मयुग पासून ते आधुनिक युगात खूप काही बदललं आहे पण एक गोष्ट बदलेली नाही. ती आहे माणसाला माणूस बनवणारी भावना. ही भावना कधी लेण्यातील चित्रांमधून तर कधी इमोटिकॉन्स मधून व्यक्त होताना दिसते, भाषेच्या पलीकडे जाउन संभाषण घडवते, हृदयांना जवळ आणते, जखमांवर फुंकर घालते. त्यामुळे कधी मजा म्हणून, कधी संभाषण प्रभावी करण्यासाठी तर कधी निव्वळ आळसामुळे हे स्मायली किंवा इमोटिकॉन्स तुमच्या चॅट विंडोमधे डोकावातच राहतील. आणि चेहऱ्यावरही एक आनंद फुलवत राहतील.
***
एक वर्षापूर्वी गूगलने जॉब करणार्या महिलांच्या आदरात 13 स्मायलीज प्रकाशित केल्या. खूप काळापासून गप्प असलेल्या मुठीच्या इमोटीकॉन्सला देखील यु एस इलेक्शननंतर वाचा फुटलेली दिसते. ट्रम्पच्या काही निर्णयांच्या विरोधात या आवळलेल्या मुठी सोशल मीडीयावर झळकल्या. मजामस्तीपलिकडे या स्मायली आता जाताना दिसतात.
***
(पूर्वप्रसिद्धी लोकमत आॅक्सिजन)