अतिप्रगत जनुकीयविज्ञान युगात विवाहसंस्थेचे भविष्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2016 10:28 AM2016-07-13T10:28:10+5:302016-07-13T15:58:10+5:30

जनुकीय पूर्वज्ञानाचा आपल्या विवाहसंस्थेवर कसा परिणाम होईल?

What is the future of the marriage organization in the era of highly advanced genetics? | अतिप्रगत जनुकीयविज्ञान युगात विवाहसंस्थेचे भविष्य काय?

अतिप्रगत जनुकीयविज्ञान युगात विवाहसंस्थेचे भविष्य काय?

Next
िष्य जाणून घेणे किंवा पुढे काय होणार हे माहित करून घेण्यात मानवाला नेहमीच रस राहिलेला आहे. असे पूर्वज्ञान फायद्याचे किती आणि तोट्याचे किती यावर विचारवंतांमध्ये नेहमी चर्चा होत असते. या चर्चेला आता आणखी एक नवा आयाम प्राप्त होताना दिसत आहे. 

पुलित्झर विजेते लेखक सिद्धार्थ मुखर्जी लिखित दुसरे पुस्तक ‘द जीन : अ‍ॅन इंटिमेट हिस्ट्री’ नुकतेच मुंबईत लाँच झाले. या प्रसंगी मुर्ती 'क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया'चे संस्थापक रोहन मुर्ती यांनी मुखर्जींसोबत चर्चा केली. अनुवंशिकशास्त्र किंवा जननशास्त्राच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे मानवाला होणाऱ्या लाभांसोबतच काही गंभीर प्रश्नदेखील निर्माण झाले आहेत. 

मुखर्जी म्हणाले, कल्पनना करा की आजपासून दहा वर्षांनी तुम्ही बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. तुम्ही डॉक्टरकडे गेला असता, बाळाच्या पेशींची तपासणी केल्यावर असे आढळून आले की, बाळाला न्युरोडिजनेरेटिव्ह डिसिज् (मेंदूतील चेतापेशींचा आजार) होण्याची ४० टक्के शक्यता आहे. अशावेळी तुमच्या लग्नावर, नातेसंबंधावर कसा परिणाम होईल? तुम्ही कशा पद्धतीने रिअ‍ॅक्ट होणार?

जनुकीय पूर्वज्ञानाचा आपल्या विवाहसंस्थेवर कसा परिणाम होईल याविषयी चिंता व्यक्त करताना मुर्ती म्हणाले की, खरंच किती अवघड होऊन बसेल जर एखाद्या व्यक्तीला कळाले की, त्याच्या जनुकांमुळे त्याला होणारे मुलं आजारांनी ग्रस्त असेल. कशा प्रकारे ही परिस्थिती हाताळायची?

पुस्तकात मुखर्जींनी लिहिले आहे की, माझ्या पत्नीला जेव्हा मी कुटुंबातील अनुवंशिक आजराबद्दल सांगितले तो क्षण खरंच खूप अवघड आणि निर्णायक होता. अशा कबुलीमुळे माझ्या नात्यावर काय परिणाम होणार याचे निश्चित असे उत्तर माझ्याकडे नव्हते.

जर समजा एखाद्या अनाथ मुलाची जनुकीय मॅपिंग केली असता कळाले की, त्याला एखादा आजार होण्याची शक्यता आहे तेव्हा त्याला कोणी दत्तक घेईल का? असे असंख्य प्रश्न आणि जर-तरच्या गोष्टी भविष्यात आपल्या समोर उभ्या राहणार आहेत. यावर मुखर्जी म्हणतात की, सर्व पूर्वज्ञान झिडकारून आपण दुर्लक्ष क रण्याचा पर्याय स्वीकारू शकतो. पण आता मात्र तसे करणे शक्य नाही.

Siddhartha Mukherjee
सिद्धार्थ मुखर्जी

Web Title: What is the future of the marriage organization in the era of highly advanced genetics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.