संगणकातील F1 ते F12 या key चा काय आहे उपयोग !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2017 11:57 AM2017-02-22T11:57:15+5:302017-02-23T17:51:36+5:30
संगणक सर्वजण हाताळतात, मात्र function keys बाबत जास्त माहित नाहीय, म्हणून स्मार्ट काम होत नाही. चला मग F1 ते F12 या key चा काय आहे उपयोग, हे जाणून घेऊया...
संगणक सर्वजण हाताळतात, मात्र function keys बाबत जास्त माहित नाहीय, म्हणून स्मार्ट काम होत नाही. चला मग F1 ते F12 या key चा काय आहे उपयोग, हे जाणून घेऊया...
F1 Key
एखादा प्रोग्रॅम किंवा सॉफ्टवेयर वापरण जमत नसेल तर ‘help’मध्ये जावं लागतं. help चं बटण मिळत नसेल तर खुशाल F1 दाबावं. help मेनू ओपन होतो.
F2 Key
एखाद्या फाईल किंवा फोल्डरचं नाव बदलायचं असेल तर F2 दाबून हे काम झटक्यात करता येतं
F3 Key
एखाद्या सॉफ्टवेयर किंवा अॅप्लिकेशनमध्ये एखादी गोष्ट सर्च करायची असेल तर F3 दाबून हे करता येतं.
F4 Key
तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरती अॅक्टिव्ह विंडो जर बंद करायची असेल तर Alt+F4 दाबून हे काम करता येतं.
F5 Key
ही फंक्शन की काय करते हे बऱ्याच जणांना माहीत असतं. रिफ्रेश किंवा रिलोड करण्यासाठी F5 की चा वापर होतो.
F6 Key
इंटरनेट ब्राऊझर सुरू असताना ही ‘की’ दाबल्यावर कर्सर थेट ‘अॅड्रेस बार’ मध्ये जातो. बहुतांशी सगळ्या इंटरनेट ब्राऊझर्समध्ये हे लागू होतं.
F7 Key
मायक्रोसॉफ्ट वर्ड सारख्या अॅप्लिकेशनमध्ये स्पेल चेक आणि ग्रामर चेक करायला या ‘की’चा वापर करता येतो.
F8 Key
विंडोज् मधला बूट मेनू अॅक्सेस करण्यासाठी F8 च्या वापर होतो.
F9 Key
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पेज रिफ्रेश करायला किंवा मायक्रोसॉफ्ट आऊटलूकमध्ये मेल पाठवायला किंवा स्वीकारायला ही की वापरतात.
F10 Key
राईट क्लिक करण्याऐवजी shift आणि F10 की दाबीनही हे काम आपण करू शकतो.
F11 Key
इंटरनेट ब्राऊझरमध्ये फुलस्क्रीन करण्यासाठी किंवा फुलस्क्रीनमधून बाहेर पडायला ही ‘की’ वापरली जाते.
F12 Key
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ‘सेव्ह अॅज्..’ मेन्यू ओपन होतो.