‘फ्रेण्डशिप डे’ ला स्पेशल दिसायचयं.. मग या स्टाइल टिप्स वाचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 07:16 PM2017-08-04T19:16:06+5:302017-08-04T19:25:57+5:30
एरवीही कॉलेजचे मुलंमुली स्मार्ट दिसण्यासाठी आग्रही असतात. पण ‘फ्रेण्डशिप डे’लात्यांच्यातला सजण्या-धजण्यातला, स्टाइल मारण्यातला उत्साह पाहण्याजोगा असतो. तुम्हालाही यंदा स्मार्ट दिसण्यासाठी खास काही करायचं असेल तर या काही ट्रिक्स आणि टिप्स
मोहिनी घारपुरे-देशमुख
फ्रेण्डशिप्स डे ची वाट तरूण मुलं मुली दरवर्षीच पहात असतात. बाजारात राख्यांबरोबरच फ्रेण्डशिप बॅण्डही दिसायला लागले की तरूणांमध्येही उत्साह संचारतो. मला आठवतं एका वर्षी तर फ्रेण्डशिप डे आणि राखीपौर्णिमा दोन्हीही एकाच दिवशी आल्यानं कॉलेजमध्ये खूप धम्माल होती. ज्याला भाऊ मानायचं तो फ्रेण्डशिप बॅण्ड घेऊन समोर यायचा. मग त्याच्याकडून बॅण्ड बांधून घ्यायचा अन त्यालाच राखी बांधायची. सगळ्या कॉलेजभर नुसती मजा सुरू होती..
एरवीही कॉलेजचे मुलंमुली स्मार्ट दिसण्यासाठी आग्रही असतात. पण असा काही विशेष दिवस असला की त्यांच्यातला सजण्या-धजण्यातला, स्टाइल मारण्यातला उत्साह पाहण्याजोगा असतो. फ्रेण्डशिप डेला तर अनेक ग्रूप्स काहीतरी ठरवून सारखं करतात, जसं, सारख्या रंगाचे कपडे घालतील. एकाच ग्रूपचे मुलंमुली एखादी सेम अॅक्सेसरी कॅरी करतील असं काहीतरी करून दिवसभर एकमेकांसोबत वेळ घालवतात.
तुम्हालाही यंदा स्मार्ट दिसण्यासाठी खास काही करायचं असेल तर या काही ट्रिक्स तुमच्यासाठी .. मग तुम्ही त्या एकट्यानं करू शकता किंवा ग्रूपनंही करू शकता.
'फ्रेण्डशिप डे' चे स्टाइल फंडे
क्रेझी नेलपॉलिश
लांब लांब नखं असलेल्या मुलींनी फ्रेण्डशिप्स डेला हाताच्या सौंदर्याकडे अधिक लक्ष द्यायला हवं. हल्ली मिरर नेलपॉलिश आणि न्यूड कलर्स एकदम इन आहेत. त्यामुळे तुम्ही नेल आर्टपेक्षाही असे नेलपॉलिश ट्राय करून पाहा.
DIY फ्रेण्डशिप्स बॅण्ड
बाजारात कितीही आकर्षक फ्रेण्डशिप्स बॅण्ड असतील तरीही तुमच्या मित्रमैत्रिणींना जर तुम्ही स्वत: तयार केलेले बॅण्ड बांधलेत तर त्याची त्यांच्या लेखी नक्कीच जास्त किंमत असेल. किंबहुना असा बॅण्ड ते त्यांची आठवण म्हणून कायम स्वरूपी सांभाळून ठेवतील. त्यामुळे इंटरनेटवर बरेच DIY आहेत ते पाहून किंवा स्वत:ची आयडिया लढवून तुम्ही एखादा हटके बॅण्ड बनवा आणि तो तुमच्या मित्रमैत्रीणींच्या हातावर ऐटीत बांधा.
जीन्स
सध्या जीन्समध्येही बाजारात अनेक नवीन स्टाइल्स आल्या आहेत. त्याचबरोबर केप्रिज, क्यूलोट्स, थ्री फोर्थ, ट्राऊझर्स यांमध्येही अनेक व्हरायटी तुम्ही यंदाच्या फ्रेण्डशिप डेला ट्राय करू शकता.
मिक्स अॅण्ड मॅच
खरंतर हा प्रकार तुमच्या अॅस्थेटीक सेन्सवरच अवलंबून आहे. तुमच्या वॉर्डरोबमधल्या पंजाबी ड्रेसेस, कुर्तीज आणि ओढण्या यांच्यात रंगसंगती साधर्म्य लक्षात घेऊन कॉम्बिनेशन करा आणि नवा ड्रेस घातल्याप्रमाणे मिरवा. कोणाच्या लक्षातही येणार नाही. फक्त थोडासा अॅस्थेटीक सेन्स मात्र वापरावा लागतो.
स्कर्टस
स्कर्टस हे तर आॅल सिझन छानच दिसतात. पण विशेषत: पावसाळ्यात फ्लोरल प्रिण्टचे स्कर्ट्स किंवा रॅप अ राऊंड, गिंगहॅम स्कर्ट वगैरे घालूनही तुम्हाला फ्रेण्डशिप्स डे ला मिरवता येईल. विशेष म्हणजे एकाच ग्रू्रुपमधल्या सगळ्या मुलींनी ठरवून स्कर्ट घालायलाही हरकत नाही .. त्यामुळे तुमचा ग्रूप उठून दिसेल.
DIY टीशर्ट्स
मुलांनाही त्यांच्या ग्रूपकरिता सारख्या रंगाचे टीशर्ट वगैरे घालता येतील. किंवा सारख्या रंगाचे टीशर्ट आणायचे आणि त्यावर मैत्रीचे संदेश रंगांनी लिहायचे. अशीही आयडीया लढवता येईल. फ्रेण्डशिप्स डेला तुम्ही हटके दिसाल हे नक्की.
कॉमन अॅक्सेसरी
ब्रेसलेट किंवा अँक्लेटसारख्या कॉमन अॅक्सेसरीज हमखास वापरा. तसच गॉगल, बेल्ट्स, ज्वेलरी यांपैकीही ग्रू्रुपमध्ये ठरवून एक सर्वांना सारखी अॅक्सेसरी निवडा आणि ती या दिवशी घाला.
याशिवाय आणखीही अनेक आयडिया लढवता येतील आणि या दिवशी स्टायलिश, हटके दिसता येईल.. बघा, तुम्हाला या स्टाइलमध्ये अॅड करायला आणखी काही सूचतय का ते...?