​कोणती भाजी फ्रिजमध्ये ठेवाल ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2016 04:37 PM2016-03-17T16:37:21+5:302016-03-17T09:37:21+5:30

खाण्याच्या अनेक भाज्या व फळे आपण खराब होऊ नये. याकरिता फ्रिजमध्ये ठेवण्याचे काळजीपूर्वक काम करतो.

Which vegetable is in the fridge? | ​कोणती भाजी फ्रिजमध्ये ठेवाल ?

​कोणती भाजी फ्रिजमध्ये ठेवाल ?

googlenewsNext
 
ारण की, फ्रेश राहाव्यात असे आपल्याला वाटते. परंतु, यामुळे त्यांचे पोषण व स्वाद संपायला लागतो. आपण अशा काही भाज्या व फळे फ्रिजमध्ये ठेवत असाल. याकरिता वाचा ही माहिती. 
बटाटा : बटाट्याला कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. ज्यादा थंड झाल्याने बटाट्याची स्टार्च शुगर होते. त्यामुळे कर्करोग होण्याचाही धोका असतो. याकरिता बटाट्यांना कागदाच्या बॅगमध्ये थंडी ठिकाणी ठेवावे. 
मध  : मधाला फ्रिजमध्ये ठेवले तर ते चिपकलेले  क्रि स्टल पदार्थ तयार होते. याकरिता घरातच त्याला ठेवावे, ऊन व फ्रिजमध्येही ठेवू नये. 
टमाटे : टमाटे लवकर खराब होतात, या भितीपोटी व ताजे राहावे याकरिता अनेकजण त्यांना फ्रिजमध्ये ठेवण्याचे काम करतात. उलट त्यामुळे त्याच्यामधील स्वाद कमी होत जातो. 
सफरचंद : टमाट्याप्रमाणेच सफरचंदही फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्याचा स्वाद हा कमी होत जातो. ज्यावेळी आपल्याला ते खायाचे असेल तर त्यापूर्वी अर्धा तास अगोदर सफचंद फ्रिजमध्ये ठेवावे. अन्य वेळेला ते बाहेर ठेवावे, त्यामुळे त्याची चव ही उत्तम लागते. 
कांदा : कांदा ठेवण्यासाठी सर्वात उत्तम जागा ठिकाण म्हटले तर कागदाच्या बॅगमध्ये कोणत्याही अंधार असणारी खोली होय. फ्रिजमध्ये ठेवल्यामुळ कांदा हा खराब व्हायला लागतो. त्याची लागण फ्रिजमधील अन्य वस्तूनाही होते.
ब्रेड : अनेकजण ब्रेडला फ्रिजमध्ये ठेवणे पसंत करतात. परंतु, फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे ब्रेड लवकर सुकून जातो. 
केळी : केळीला कधीही फ्रिजच्या बाहेरच ठेवावे. पण खाण्यापूर्वी ते काळे पडायला लागले तर ते फ्रिजमध्ये ठेवावे. त्यानंतरला त्याची केळीची ब्रेड बनविण्यासाठी उपयोग होऊ शकतो. 
लसण : लसण जर फ्रिजमध्ये ठेवला तर त्याला कोंब येण्यास सुरुवात होते. व तो रबराप्रमाणे होतो, त्याकरिता लसणाला नेहमी फ्रिजच्या बाहेरच ठेवावे.



Web Title: Which vegetable is in the fridge?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.