तू सोबत असताना...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2016 11:15 AM2016-12-25T11:15:12+5:302016-12-25T11:15:12+5:30

तू सोबत असताना, आयुष्य किती छान वाटतं... उनाड मोकळं, एक रान वाटतं... सदैव मनात जपलेलं, पिंपळपान वाटतं... कधी बेधुंद, कधी बेभान वाटतं... खरचं, तू सोबत असताना, आयुष्य किती छान वाटतं...!

While you're together ...! | तू सोबत असताना...!

तू सोबत असताना...!

googlenewsNext
ong>-Ravindra More

तू सोबत असताना, आयुष्य किती छान वाटतं...
उनाड मोकळं, एक रान वाटतं...
सदैव मनात जपलेलं, पिंपळपान वाटतं...
कधी बेधुंद, कधी बेभान वाटतं...
खरचं, तू सोबत असताना, आयुष्य किती छान वाटतं...!



कॉलेज म्हटले की आपोआपच तरुणाईच्या मनात पे्रमभावना जागृत व्हायला लागतात. काहीजण प्रेमाच्या भानगडीत पडत नाही. एकतर त्यांच्या आयुष्याचे टारगेट फक्त करिअर असते, नाहीतर आई-वडिलांचा धाक असतो. पण बऱ्याचदा असे असूनही आपल्याला एखादी व्यक्ती एवढी आवडते की आपण कळत-नकळत त्याच्या प्रेमात पडतो. मग प्रेमात आकांत बुडणं,  प्रियकर किंवा प्रेयसीसाठी काहीही करणं हे सर्व आलंच. 
आता मात्र बदलत्या काळानुसार प्रियकर अथवा प्रेयसीसोबत ‘डेट’वर जाण्याची संकल्पना रुढ होऊ पाहते आहे. आपणही कुणाच्या प्रेमात असाल आणि ‘डेट’वर जाण्याची इच्छा असेल तर आपली ‘डेट’ कशी अविस्मरणीय होईल याबाबत जाणून घेऊया...

* कॉलेजमध्ये किंवा आॅफिसमध्ये बसले असाल आणि तेवढ्यात प्रियकर अथवा प्रेयसीचा फोन आला, की येथे बोअर होत आहे. बाहेरचे वातावरण खूपच मस्त आहे, चल कुठे तरी चांगल्या निसर्गरम्य परिसरात फिरायला जाऊया असे म्हणत वेळ न वाया घालविता लगेच जाण्याची तयारी करा. छान बाईक किंवा कारची व्यवस्था करा आणि ज्या रस्त्यावर फारशी गर्दी नसेल तो रस्ता पकडा. थोडक्यात एकांत मिळवा. शिवाय हिरवा शालू परिधान केलेला निसर्ग तुमच्यासोबत असेल. 

* डेट अजून अविस्मरणीय होण्यासाठी आपली आवडती व्यक्ती म्हणजेच प्रियकर अथवा प्रेयसीला तिला/ त्याच्या तिच्या आवडीचे गिफ्ट द्यायला विसरू नका. त्यात एकमेकांना आवडणाऱ्या गोष्टींचा समावेश असावा.  या गोष्टी तुमच्या व त्यांच्या नेहमी स्मरणात राहतील. 

* चांगला एकांत मिळविण्यासाठी एखादा चित्रपट पाहायलाही जाऊ शकता. त्यासाठी गाजलेलाच चित्रपट असायला हवा असे नाही. पडलेल्या चित्रपटाला गेलात तरीही एकांत मिळेल. जिथे गर्दी नाही अशा सीट्स बघून बसा म्हणजे झालं. मग काय छोटीशी पार्टीही तिथे करू शकता. स्नॅक्स, कोल्ड्रिंक्सच्या साथीने ही पार्टीही रंगेल. तुमच्या एकांताचा कुणीही भंग करायला येणार नाही आणि हो, इतरांचाही रसभंग तुम्ही होऊ देऊ नका.

 * बाईकवर मागे प्रेयसी बसलेली असेल आणि हायवेवरुन सफर करत असाल तर तो अनुभव काही औरच असतो. गाडीवर जाताना प्रेम बिनधास्त करा, मात्र तेवढीच काळजीही घ्या. जाताना थोडे सावकाश जा आणि वाहनांवर लक्ष असू द्या. 

* गार्डनमध्ये किंवा कॉफी हाऊसमध्ये फिरताना हातात हात घालून फिरण्यास काहीही हरकत नाही. टपोरीगिरी करणाऱ्यापासून थोडे सावध राहा. 

* पावसात एकमेकांसोबत भिजण्याचे सुख काही वेगळेच असते. त्यामुळे चुकूनही पावसात छत्री उघडू नका. नाही तर मिळणाऱ्या एन्जॉयवर पाणी फिरेल. 

* एकमेकांसोबत गप्पा करताना रोमॅँटिक विषयाला प्राधान्य द्या. उगाच घरी आणि शेजारी काय झाले यात वेळ वाया घालवू नका. विशेष म्हणजे गप्पा करताना मोबाइल स्वीच आॅफ ठेवा. जेणेकरून डिस्टर्ब नको. 

* नियोजन करून जात असाल तर ड्रेसची निवड एकमेकांच्या सहमतीची असावी. यामुळेही आनंदात भर पडू शकते. 

* रुसवा, फुगवा असेल तर तो जास्त नसावा. नाहक एकमेकांना समजविण्यातच वेळ वाया जाईल. समोरचा काहीसा नाराज दिसत असला तर थोडी चिडवाचिडवी करा, पण थोडी.

* डेटवरुन परत आल्यानंतर याबाबत चर्चा कुणाशी करु नका. नाहक घेतलेल्या आनंदी अनुभवाचा ‘किरकिरी’ होईल. 

Web Title: While you're together ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.