काही मुलांना जास्त चॉकलेट का आवडते?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:09 AM2016-01-16T01:09:33+5:302016-02-05T06:03:31+5:30
केवळ लहानच नाही तर मोठय़ांनासुद्धा चॉकलेटचा मोह आवरत नाही. परंतु काही मुलांना चॉकलेट इतके जास्त आवडत...
Next
क वळ लहानच नाही तर मोठय़ांनासुद्धा चॉकलेटचा मोह आवरत नाही. परंतु काही मुलांना चॉकलेट इतके जास्त आवडत असते की ते नेहमी चॉकलेटसाठी रडत असतात. असे का होत असावे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संशोधकांनी अध्ययन केले असता असे दिसून आले की, काही मुलांना गोड चवीच्या संवेदना कमी असतात. त्यामुळे एक ठराविक प्रमाणात गोड चव मिळण्यासाठी ते जास्तीत जास्त गोड खातात.मोनेल केमिकल सेन्सेस सेंटर येथील डॅनियल रीड हे संशोधन प्रमुख आहेत. ते म्हणतात, 'काही मुलांना गोड चवीच्या संवेदना जास्त असतात तर काहींमध्ये कमी. प्रत्येकाला एक ठराविक प्रमाणात गोड चव गरजेची असते. आहारामधून जर त्यांना त्या प्रमाणात गोडवा मिळाला नाही तर चॉकलेट खाण्याची त्यांची इच्छा वाढते.'या अध्ययनामध्ये सात ते चौदा वर्ष वयोगटातील निरोगी २१६ मुलांचा सामावेश करण्यात आला होता. त्यांना कमीत कमी किती गोडवा लागतो याचे प्रमाण निश्चित करण्यात आले.