अ‍ॅक्टिंग सोडणार नाही : जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2016 04:00 PM2016-04-26T16:00:00+5:302016-04-26T21:30:00+5:30

हॉलीवुड स्टार जोडी फोस्टर सध्या दिग्दर्शनाकडे वळाली असली तरी, ती अभिनयापासून दूर जाणार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

Will not quit: Jodi | अ‍ॅक्टिंग सोडणार नाही : जोडी

अ‍ॅक्टिंग सोडणार नाही : जोडी

Next
लीवुड स्टार जोडी फोस्टर सध्या दिग्दर्शनाकडे वळाली असली तरी, ती अभिनयापासून दूर जाणार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. जेव्हा जोडी तीन वर्षाची होती, तेव्हापासूनच ती अभिनय क्षेत्रात काम करीत आहे. ‘मनी मान्स्टर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेल्या जोडीने सांगितले की, दिग्दर्शन क्षेत्रात काम करताना मला आनंद होत आहे. सध्या मी याकडेच अधिक लक्ष देत आहे. मात्र अभिनय करणे मी सोडणार नाही. सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या ‘मनी मान्स्टर’ हा चित्रपट भारतात १३ मे रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात जुलिया राबर्ट्स, जॉर्ज क्लूनी आणि जॅक ओ कोनेल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Web Title: Will not quit: Jodi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.