लग्नसमारंभात लहेंगा साडी घालणार आहात? मग लहेंगा साडीची फॅशन काय म्हणते ते माहित आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 05:56 PM2017-06-30T17:56:35+5:302017-06-30T17:56:35+5:30
लहेंगासारीज रिच असतात पण त्या आपण घातल्यावर रिच दिसण्यासाठी काही गोष्टी मुद्दाम कराव्या लागतात.
- मोहिनी घारपुरे-देशमुख
लग्नसमारंभात नवऱ्यामुलीसोबत तिच्या मैत्रिणी, बहिणी आपली नटण्यामुरडण्याची हौस भागवत असतात. फॅशनमध्ये जे जे इन असतं ते करून बघण्याची सगळ्याजणींनाच इच्छा असते. सध्याच्या लग्नातल्या फॅशनबद्दल सांगायचं तर लेहेंगा फॅशनची खूपच चलती आहे. खरंतर लेहेंग्याची फॅशन ही काही आजची नाही गेल्या कित्येक वर्षांपासून लग्नातल्या पेहेरावासाठी लेहेंग्याला महत्त्व दिलं जातं. पण या लेहेंग्याच्या फॅशनमध्येही बरेच अपडेशन होत आहेत. त्यातलंच अपडेशन म्हणजे लेहेंगा सारी. लेहेंगाचोली, घागराचोली पाठोपाठ अलिकडे लेहेंगा सारीनंही आपलं खास स्थान बाजारपेठेत निर्माण केलं आहे.
फॅशनेबल, मॉडर्न राहाणाऱ्या तरूणी लग्नसमारंभात जरीकाठाची साडी, शालू, पैठणी नेसण्यापेक्षा लेहेंगा सारीचीच हमखास निवड करतात. नेटचे पल्लू आणि एम्ब्रॉयडरी असलेला लेहेंगा असे या सारीचे विशेष सांगता येतील. बाजारात लेहेंगासारीचे कित्येक प्रकार आहेत. सारीच्या आणि पल्लूच्या रंगांमध्ये भरपूर कॉम्बीनेशनचे प्रयोग केलेले असतात.