मुंबईत विलियम-केट खेळले क्रिकेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2016 11:41 PM2016-04-10T23:41:18+5:302016-04-10T21:15:47+5:30
ब्रिटनचे प्रिंस विलियम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन हे शाही जोडपे आज मुंबईत पोहोचले. येथील ओवल मैदानावर त्यांनी क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.
प रिन्स विलियम आणि केट मिडलटन हे रॉयल कपल आज मुंबईत पोहोचले. २६/११ हल्ल्यातील मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि यानंतर काय केले असावे? तर येथील ओवल मैदानावर क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी आपला सचिन म्हणजे सचिन तेंडुलकरही हजर होता. सचिन व त्याची पत्नी अंजली या दोघांनी या रॉयल कपलचे वेलकम केले.
.
.............................................
प्रिन्स विल्यम-केट मुंबईत
ब्रिटनचे प्रिंस विलियम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन हे शाही जोडपे आज मुंबईत पोहोचले. प्रिन्स विलियम आणि केट यांचा हा पहिला भारत दौरा आहे. हे शाही जोडपे सात दिवसांच्या भारत आणि भूतान दौºयावर आले आहे. मुंबईपासून या जोडप्याच्या भारत दौºयाची सुरुवात झाली. निळ्या रंगाच्या सूटबुटातील विलियम आणि प्रिन्टेड लाल रंगाच्या ड्रेसमधील केट मुंबईत दाखल होताच त्यांचे पारंपरिक स्वागत झाले.विलियम आणि केट आपल्या भारत दौºयात समकालीन भारतीय जीवनातील विविध पैलूंचा अनुभव घेणार आहेत. मुंबईत एक दिवस घालवल्यानंतर उद्या हे जोडपे दिल्लीला पोहोचणार आहे. त्यानंतर े १२ एप्रिलला आसाम आणि १३ एप्रिलला काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा दौरा करणार आहे. सोबतच या उद्यानाजवळ राहणाºया आदिवासींच्या प्रथा-परंपरांचा अनुभव घेणार आहे. १४ एप्रिलला विलियम-केट भूतान दौºयावर जातील पुन्हा १६ एप्रिलला परत येत जगप्रसिद्ध ताज महालला भेट देणार आहे.