/>काही घटनांचा काय अर्थ लावावा, हेच कळत नाही. मध्यप्रदेशातील आमखाव गावातील गावकर्यांनासुद्धा असाच प्रश्न पडला आहे. गावातील एका साठ वर्षीय महिला घराच्या अंगणात काम करत असताना अचानक आभाळातून बर्फाचा गोळा आला आणि तिच्या खांद्यावर आदळला. पण भर उन्हात आकाशातून बर्फ तरी कसा पडणार? मात्र जेव्हा याचे खरे कारण कळाले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.तो बर्फाचा गोळा म्हणजे विमानातील मलविष्ठा होती. चुकीने विमानातून बाहेर पडलेला गोळा राजराणी गौड या महिलेवर धडकला. अशाप्रकारची भारतातील ही बहुदा पहिलाच घटना आहे. प्रत्यक्षदश्रींनी सांगितले की, 'तो गोळा राजराणीच्या खांद्यावर आदळण्याचा आधी घराच्या छतावर धडकल्याने तिचा जीव वाचला.' विमानाच्या बाहेर पडणार्या अशा मलविष्ठेच्या घटनेला 'ब्लू आईस' म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, खूप उंचीवरून विमान उडत असल्यामुळे तेथील अतिकमी तापमानामुळे मलविष्ठेचा गोठून तिचा गोळा तयार झाला असावा. जर खरोखरच हे 'ब्लू आईस' असेल तर एअरक्राफ्ट रुल्स, २0१२ नुसार राजराणी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पात्र आहे.
Web Title: Women get injured due to dirt!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.