गेलच्या विरोधात उभी राहिली महिलाशक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:06 AM2016-01-16T01:06:11+5:302016-02-12T02:11:17+5:30

क्रिकेटच्या मैदानावर ख्रिस गेल हे नाव ऐकताच भल्याभल्या गोलंदाजांना घाम सुटतो. केवळ बॉऊंड्री लाईनच न...

Women's power stood against Gayle | गेलच्या विरोधात उभी राहिली महिलाशक्ती

गेलच्या विरोधात उभी राहिली महिलाशक्ती

Next
रिकेटच्या मैदानावर ख्रिस गेल हे नाव ऐकताच भल्याभल्या गोलंदाजांना घाम सुटतो. केवळ बॉऊंड्री लाईनच नाही तर स्टेडियमच्या बाहेर बॉल टोलवण्याची त्याची क्षमता तर लाजवाबच. त्याचे मैदानावरचे कॅरिबियन नृत्य सगळ्यांनाच आवडते. मात्र नव्या वर्षाची सुरुवात गेलसाठी फार वाईट झाली. लाईव्ह टीव्हीवर महिला पत्रकाराशी सलगी केल्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका होत आहे. आता तर गेलच्या विरोधात महिलाशक्ती उभी ठाकली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या बिग बॅश लिग सामन्याच्या दरम्यान महिला पत्रकाराला त्याने डेटवर येण्याची मागणी केली. यावरून उठलेल्या वादळामुळे त्याला स्पर्धेत खेळण्यास बंदी आणि ७२00 डॉलर्सचा दंड ठोठावला गेला. त्याला माफीसुद्धा मागावी लागली. पण हे वादळ शमण्याचे काही चिन्हे दिसत नाही. ख्रिस गेलने यापूर्वीही अनेक वेळा त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा खुलासा जगभरातील अनेक महिलांनी केला आहे.

नाव न सांगण्यच्या अटीवर एका महिला पत्रकाराने सांगितले की, ऑस्ट्रेलियात झालेल्या २0१५ वर्ल्ड कपच्या वेळी गेलने तिला उद्देशून लॉकर रूममध्ये जाणूनबुजून टॉवेल खाली पाडला. योवने सॅम्पसन यांनी सांगितले की, गेल हा पहिल्या क्रमांकाचा स्त्रीलंपट आहे. आतापर्यंत त्याच्यावर कोणतीच कारवाई कशी झाली नाही याचे मला आश्‍चर्य वाटते. तो जसा होता, आताही तसाच आहे आणि तसाच राहणार यात काही शंका नाही.

Web Title: Women's power stood against Gayle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.