‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने जाहीर केली सुरक्षित देशांची यादी. या यादीतल्या 10 देशात तुम्ही बिनधास्तपणे सहलीचा प्लॅन करू शकता!
By Admin | Published: July 17, 2017 06:36 PM2017-07-17T18:36:41+5:302017-07-17T18:36:41+5:30
मनात कोणत्याही शंका-कुशंका न बाळगता फिरायला जायचं असेल तर जगातल्या सर्वांत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या देशांना भेटी देण्याचा आॅप्शन तुमच्याकडे आहे.
- अमृता कदम
कोणत्याही अनोळखी ठिकाणी प्रवासाला जायचं म्हणजे सर्वांत महत्त्वाची असते सुरक्षितता. त्यातून जर तुम्ही परदेशात फिरायला जात असाल तर नवीन भाषा, नवीन लोकांमध्ये आपण सुरक्षित असू की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे बरेच जण ट्रॅव्हल कंपन्यांसोबतच जाण्याचा मार्ग स्वीकारतात. पण ट्रॅव्हल कंपनीबरोबर फिरताना कदाचित एखादं ठिकाण एक्सप्लोअर करण्यावर मर्यादा येऊ शकतात. म्हणूनच मनात कोणत्याही शंका-कुशंका न बाळगता फिरायला जायचं असेल तर जगातल्या सर्वांत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या देशांना भेटी देण्याचा आॅप्शन तुमच्याकडे आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने सर्वांत सुरक्षित देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत दहा देशांचा समावेश आहे. या दहा देशांना तुम्ही बिनघोरपणे भेट देऊ शकता आणि पर्यटनाचा आनंद लुटू शकता.
1) फिनलंड
जगातल्या सुरक्षित देशांच्या यादीत फिनलंडचा क्र मांक सर्वांत प्रथम आहे. फिनलंडमध्ये तुम्हाला प्रचंड अशा भौगोलिक विविधतेचं दर्शन घडतं. स्वच्छ, नितळ असे बाल्टिकचे समुद्रकिनारे आणि घनदाट जंगलं. एक दोन नव्हे तर तब्बल 30 नॅशनल पार्क या छोट्याशा देशात आहेत.