​जगातील सर्वात मोठ्या हीर्‍याला ग्राहक कोणी मिळेना..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2016 07:41 AM2016-07-01T07:41:27+5:302016-07-01T13:11:27+5:30

पैलू न पाडलेला जगातील सर्वात मोठा हीरा ‘लेसेडी ला रोना’ची लंडन येथे झालेल्या एका लिलावात विक्री होऊ शकली नाही.

The world's largest diamond never got a customer. | ​जगातील सर्वात मोठ्या हीर्‍याला ग्राहक कोणी मिळेना..

​जगातील सर्वात मोठ्या हीर्‍याला ग्राहक कोणी मिळेना..

Next
लू न पाडलेला जगातील सर्वात मोठा हीरा ‘लेसेडी ला रोना’ची लंडन येथे झालेल्या एका लिलावात विक्री होऊ शकली नाही.

टेनिस बॉल एवढ्या आकाराच्या या विशाल हीर्‍याची जी किमान किंमत ठरविण्यात आली होती त्यापेक्षा कमी बोली लागल्याने त्याची विक्री करण्यात आली नाही.

सुमारे अडीचशे कोटी वर्षे जुना हा हीरा ११०९ कॅरेट्सचा असून मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बोट्सवाना  येथे ‘लुकारा डायमंड कॉर्प’ कंपनीच्या करोवे खाणीमध्ये तो सापडला होता.

७० मिलियन डॉलर्समध्ये (सुमारे ४७२ कोटी रु.) याची विक्री होईल असा अंदाज होता; सर्वात उच्च बोली मात्र ६१ मिलियन (४११ कोटी रु.) डॉलर्सपर्यंतच गेली.

विशेष म्हणजे अशा प्रकारचा एवढ्या मोठ्या हीर्‍याचा प्रथमच लीलाव झाला. ‘साऊथबाय’ या लिलावसंस्थेने ‘अभूतपूर्व असा लिलाव’ म्हणून याचे वर्णन केले होते.

बोट्सवानाची भाषा त्सवानामध्ये ‘लेसेडी ला रोना’चा अर्थ ‘आमचा प्रकाश’ असा होतो. ‘जेमोलॉजिकल इन्स्टीट्यूट आॅफ अमेरिका’ने या हीºयाला टाईप ककअ प्रतवारी दिली आहे. या प्रतवारीतील हीरे सर्वात रासायनिकदृष्ट्या सर्वात शुद्ध आणि आॅप्टीकल पारदर्शी असतात.

Web Title: The world's largest diamond never got a customer.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.