​जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा अजब सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2016 02:01 PM2016-08-06T14:01:00+5:302016-08-06T19:31:00+5:30

कार्लोस यांना वाटते की, कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून केवळ तीनच दिवस काम करावे आणि चार दिवस सुट्या एन्जॉय कराव्यात.

The world's second richest person's unique advice | ​जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा अजब सल्ला

​जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा अजब सल्ला

Next
्वात आधी तर तुम्ही तुमचा रेझ्युमे अपडेट करा आणि कार्लोस स्लिम यांना पाठवून द्या. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत दुसऱ्या  क्रमांकावर असणारे कार्लोस बॉस म्हणून कदाचित सर्वात कूल व्यक्ती असतील. कारण कार्लोस यांना वाटते की, कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून केवळ तीनच दिवस काम करावे आणि चार दिवस सुट्या एन्जॉय कराव्यात.

लक्ष वेधले गेले ना? तुम्ही जे वाचत आहात ते खरं आहे. मेक्सिको देशातील कार्लोस स्लिम यांनी जगभरातील कर्मचाºयांना सुखावणारा असा विचार मांडला आहे आणि सर्व कंपन्यांनी तो अंमलात आणावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, कामाचा व्याप कमी आणि चार दिवस मोकळे मिळाल्यामुळे लोक आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकतील. पर्यटन, मनोरंजन, खेळ, सांस्कृती, शिक्षण इ. क्षेत्रांना चालना मिळेल.

पण खरंच असे करणे शक्य आहे का? तीन दिवसांचा वर्किंग वीक व्यवहार्य आहे का? कार्लोस यांना तरी तसे वाटते. ते म्हणतात, जस जसे तंत्रज्ञान अधिक प्रगत होत जाईल तशी मानवाच्या कामाचे प्रमाण कमी होत जाणार. त्यामुळे जर कर्मचाºयांनी तीनच दिवस काम केले तर इतरांना रोजगाराची संधी निर्माण होईल.

कार्लोस यांच्या ‘सु’विचारानुसार लोकांची मिळकत तेवढीच राहील फक्त कामाचे दिवस कमी होतील. आता या मास्टर प्लॅनमध्ये अनेक त्रुटी आहेत; पण ५९ बिलियन डॉलर्स एवढ्या अमाप संपत्तीचा मालक म्हणून त्यांच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार केलाच पाहिजे, नाही का?

Web Title: The world's second richest person's unique advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.