यशोशिखर गाठताना...!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2016 05:13 PM2016-11-11T17:13:14+5:302016-11-11T17:13:14+5:30
आज प्रत्येकजण यश मिळविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करताना दिसतात, मात्र यश हे क्वचितच लोकांच्या पदरी पडते. नेमके असे का होते? प्रयत्न तर सर्वचजण करतात, मग यशाचे प्रमाण कमी का? ज्यांना यश मिळाले त्यांच्या नजरेत यश म्हणजे जे आपल्याला हवे ते मिळणे होय...
Next
आज प्रत्येकजण यश मिळविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करताना दिसतात, मात्र यश हे क्वचितच लोकांच्या पदरी पडते. नेमके असे का होते? प्रयत्न तर सर्वचजण करतात, मग यशाचे प्रमाण कमी का? ज्यांना यश मिळाले त्यांच्या नजरेत यश म्हणजे जे आपल्याला हवे ते मिळणे होय. यशाला मिळवून जे सुख आपल्याला मिळते ते अवर्णनीय असते. यश मिळविण्याच्या काही टिप्स असतात, ज्या आपणही आयुष्यात अंगिकारल्या तर यश हमखास मिळू शकते. आजच्या सदरात यशोशिखर गाठताना काय करायला हवे याविषयी जाणून घेऊया...
आयुष्यात प्रत्येक कामाची निवड विचारपूर्वक, आपली बलस्थाने ओळखून आणि योग्यतेनुसारच निवडायला हवेत, आणि त्यांना पूर्ण केल्यानंतरच थांबा, मग ते पूर्ण करण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी थांबू नका. झोप, आळस, गप्पा-गोष्टी आदी सवयींना त्यागून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. बहानेबाजी किंवा टाळाटाळ करण्याची प्रवृत्ती मनुष्याला अकर्मण्य बनविते. प्रत्येक समस्येचे निराकरण करा, घाबरुन पलायन करु नका. अपयशामुळेच यशाचा मार्ग प्रशस्त होत असतो. मतिमंद मुलांना जर कलात्मक छंदाकडे प्रेरित केले तर त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास तीव्र गतीने होतो, हे संशोधकांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यांना मिळालेली नवी प्रेरणाच त्यांच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरते. म्हणून नेहमी सकारात्मक विचारसरणी धारण करावी, आशावादी रहावे, कारण नकारात्मक विचारसरणी मनुष्याला अपयशाकडे नेत असते.
आजच्या प्रगतीशील युगात अपंगदेखील मागे नाहीत. ते एखाद्या कलात्मक छंदाला अंगीकारुन आपल्या पायांवर उभे राहून आपल्या परिवारात आणि समाजात आत्मसन्मानाने जगू शकतात. फक्त गरज असते ती, आपली बलस्थाने ओळखून त्यात संपूर्ण ताकदीने एकजूट होण्याची. अशाच लोकांच्या सान्निध्यात राहा, जे आपल्यासारखेच महत्त्वाकांक्षी, परिश्रमी तसेच दृढ इच्छाशक्तीचे असतील. निराशावादी लोकांसोबत राहाल तर निराशाच पदरी पडेल. निराशा यशाच्या मागार्तील मोठा अडसर आहे.
कोणत्याही कामात अपयश आल्यास नशिबाला दोष न देता पुन्हा नव्याने संपूर्ण शक्ती व निष्ठासोबत आपले ध्येय प्राप्तीसाठी जोमाने उभे राहा. आपले डोळे अर्जुनासारखे फक्त आपल्या ध्येयावर केंद्रित करा. आपला मूड नेहमी फ्रेश ठेवा. चांगली वेळ मूडच्या कारणाने थांबत नाही. यश मिळविण्यासाठी वेळेचे महत्त्व जाणा. एकापेक्षा जास्त ध्येय असतील तर प्राधान्यक्रमाने निश्चित करा आणि निष्ठेने ध्येयाकडे मार्गस्थ व्हा, यश नक्कीच मिळेल.
आव्हानात्मक बदलांचा स्वीकार करा.
* परिवर्तन ही जीवनाची वास्तविकता आहे. त्यामुळे त्याला आव्हान समजून प्रत्येक अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक परिवर्तन पुढे जाण्याचा मार्ग दाखवते अथवा ध्येयाजवळ पोहोचवते.
* उदासीनतेचे मुख्य कारण म्हणजे आमच्या मनात अतार्किक इच्छा असतात. त्यांना स्वत:पासून दूर करा. इच्छा कमी केल्यास त्या पूर्ण करणे सोपे जाते.
* परिस्थिती अनुकूल असल्यास तिचा फायदा घ्या. अनुकूल नसल्यास चिंता करू नका. एक संधी हातून गेल्यानंतर दुसºया संधीची वाट पाहा. मात्र, ती संधी दवडणार नाही याची काळजी घ्या.
* यशस्वी लोक काहीही वेगळे करत नाहीत; पण ते वारंवार प्रयत्न करीत असतात. त्यात येणाºया अडचणींमध्येही ते पुढचे पाऊल अगोदर टाकतात. तसेच चुकीच्या निर्णयानंतरही समस्यांमधून समाधान शोधण्याचा प्रयत्न करीत असतात.
* ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांची चिंता करू नये. अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, ज्या नियंत्रणात आणता येऊ शकतील. धैर्य ठेवल्यास चांगले परिणाम दिसून येतात.
* समस्यांवर वारंवार चर्चा करून त्यातून मार्ग निघत नाही. नकारात्मकता मात्र निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहा आणि त्यातून सर्वांना सांगा. निराशेतूनही आशेचा किरण शोधण्याचा प्रयत्न करायला हवा.
* एकदम ध्येयाकडे लक्ष न देता छोटे-छोटे ध्येय ठरवा. ते सहजगत्या मिळू शकेल आणि पुढे जाण्याची उर्मी वाढेल. ध्येयाच्या दिशेने रोज एक छोटे पाऊल टाकल्यास ते ध्येयाजवळ पोहोचवेल.
* कोणत्याही लहानसहान मदतीसाठी इतरांची स्तुती केली पाहिजे. त्यातून स्वत:ला आनंद मिळू शकेल. तसेच छोटे यशही मोठे वाटू लागेल.
* आपल्या भावनांना वाव देण्याचा प्रयत्न करायला हवा. दुसºयांना आनंदी करण्यासाठी मनातील गोष्ट सांगायला विसरू नका.