तुमच्या दिसण्यावरून ठरतो तुमचा पगार'जसं दिसतं, तसं...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:08 AM2016-01-16T01:08:51+5:302016-02-05T13:44:40+5:30

तुमच्या दिसण्यावरून ठरतो तुमचा पगार 'जसं दिसतं, तसं नसतं' असे म्हणतात. मात्र आजच्या दिखाव्याच्या...

As you look at what you see as your salary, as well ... | तुमच्या दिसण्यावरून ठरतो तुमचा पगार'जसं दिसतं, तसं...

तुमच्या दिसण्यावरून ठरतो तुमचा पगार'जसं दिसतं, तसं...

googlenewsNext
मच्या दिसण्यावरून ठरतो तुमचा पगार
'जसं दिसतं, तसं नसतं' असे म्हणतात. मात्र आजच्या दिखाव्याच्या जगात मात्र सगळे काही दिसण्यावर अवलंबून आहे. एका नव्या सर्वेक्षणातून असे दिसून आले की दिसायला सुंदर असलेल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या सामान्य दिसणार्‍या सहकार्‍यांपेक्षा जास्त पगार मिळतो. त्यामुळे 'लूक्स डज मॅटर' हे ही गोष्ट खरी ठरत आहे. या विषमतेचे कारण लोकांच्या प्रवृत्तीमध्ये आहे. सुंदर लोकांकडे आपण जास्त लक्ष देतो. त्यामुळे त्यांना हुशारी, बुद्धिमत्ता आणि कामगिरी दाखविण्याची संधी इतरांच्या तुलनेत अधिक मिळते. रुपवान असल्याने फस्र्ट इम्प्रेशन पाडण्यास मदत मिळते. रुपवान आणि त्याबरोबर आत्मविश्‍वास, संभाषण कौशल्य आणि सृजनशीलता असेल तर पाहायचेच काम नाही. अशा ऑल इन वन कर्मचार्‍यांना कॉर्पोरेट कंपन्या जास्त पैसे मोजून स्वत:कडे ठेवतात. याचाच अर्थ की, आजच्या स्पर्धेच्या युगात तुमचं दिसणं तुमच्या फायद्याचे ठरू शकते. मात्र अनेक लोक या प्रवृत्तीचा स्वीकार करत नाही. आयटी कंपनीचे एचआर मॅनेजर शशिकांत नटराजन म्हणतात, 'तुमचं दिसणं फॅशन, चित्रपट किंवा हॉटेलिंग व्यावसायात महत्त्वाचे असेल, जेथे लोकांशी संबंध जास्त येतो. मात्र, आयटी सेक्टरमध्ये जेथे कर्मचारी पूर्ण वेळ कॉम्प्युटर स्क्रीनसमोर असतात, तेथे दिसण्याला काय महत्त्व द्यायचे?'

Web Title: As you look at what you see as your salary, as well ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.