​तरुणांनो...पार्टीत जाताय !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2016 04:43 PM2016-12-17T16:43:44+5:302016-12-17T16:43:44+5:30

एखादी पार्टी किंवा समारंभ असला की तिथे जाण्यासाठी नटूनथटून जाणे हे आता फक्त महिलांच्याच बाबतीत राहिले नाही, तर पुरुषही त्यात मागे नाहीत. पार्टीत आपला प्रभाव इतरांपेक्षा वेगळा पडावा यासाठी पुरुषही विशेष वेशभूषा करताना दिसू लागले आहेत.

Youngsters ... go to the party! | ​तरुणांनो...पार्टीत जाताय !

​तरुणांनो...पार्टीत जाताय !

Next
ong>-Ravindra More

एखादी पार्टी किंवा समारंभ असला की तिथे जाण्यासाठी नटूनथटून जाणे हे आता फक्त महिलांच्याच बाबतीत राहिले नाही, तर पुरुषही त्यात मागे नाहीत. पार्टीत आपला प्रभाव इतरांपेक्षा वेगळा पडावा यासाठी पुरुषही विशेष वेशभूषा करताना दिसू लागले आहेत. नाताळ आणि ३१ डिसेंबर रोजी मित्रमंडळी, नातेवाईक तसेच आॅफिसचे सहकारी यांच्यातील पार्ट्या ठरलेल्याच असतात. साहजिकच या पार्ट्यांमध्ये फॅशनेबल दिसायला कोणाला नाही आवडणार. आजच्या सदरात तरुणांनी कोणती फॅशन करावी किंवा आपला लूक इतरांपेक्षा हटके दिसण्यासाठी कोणता पेहराव करावा याबाबत जाणून घेऊया. 

लेदर जॅकेट
पार्टीत पेहरावात रुबाबदार लेदर जॅकेटस्ची भर पडू लागली आहे. आधी फक्त शर्ट आणि टी-शर्ट हे दोनच पर्याय मुलांसाठी उपलब्ध होते. त्याने त्यांच्यातील रांगडेपणा अधिक अधोरेखित होतो. त्यामुळे हल्ली पार्टीमध्ये लेदर जॅकेट्स मोठ्या प्रमाणात दिसतात. ब्ल्यू डेनिम, फिटिंग व्हाईट प्लेन टी-शर्ट, त्यावर वजनदार लेदर जॅकेट आणि पायात हाइटेड शूज असा रॉकस्टार लूक पार्टीला जाताना कॅरी केलेला पाहायला मिळतो.

लोफर
विशेष प्रसंगी आपण फॅशनेबल जॅकेट, टी-शर्ट, चिनोज असे पोशाख परिधान करून जातोच. या पोशाखात अधिक आकर्षक दिसण्यासाठी बूट किंवा चपलांऐवजी लोफरचा वापर करु शकता. विशेष म्हणजे जिन्स आणि चिनोज या दोघांवर हे रंगीबेरंगी लोफर एकदम चांगले दिसतात.

ब्लेझर
पार्टीसाठी ब्लेझर घालणं हा काही नवीन प्रकार नाही. ब्लेझर ही जुनी स्टाइल आहे. मात्र काळानुरूप त्याचे रंग आणि डिझाइन्समध्ये थोडेफार बदल झाले आहेत इतकंच. लेदर जॅकेट्सच्या स्टाइलप्रमाणे ब्लेझरही पाटीसार्ठी पूर्वीपासूनच इन आहेत. हल्ली लेदर जॅकेटला पर्याय म्हणून वेल्व्हेट ब्लेझरसुद्धा बाजारात आले आहेत. अशा प्रकारचे जॅकेट्स आणि ब्लेझर सर्वसामान्यपणे डेनिमवर परिधान केलेले पाहायला मिळतात. तसेच कॉटनच्या चिनोजवरही हे जॅकेट्स शोभून दिसतात. तसेच सध्या प्रिटेंड ब्लेझरचीही सध्या तरुणांमध्ये चलती दिसून येते.

वुलन मफलर किंवा स्कार्फ
हिवाळ्यात बरेचजण पूूर्वी मफलरचा वापर करायचे. मात्र, तरुणांना ते आवडत नसे. कारण त्यामुळे पारंपारिक लूक दिसायचा. मात्र आता मफलरने आधुनिक अवतार घेतला असून ते स्कार्फ  म्हणून ओळखले जाऊ लागले. हे स्कार्फ नुसते उबेसाठीच नव्हे तर रुबाबदारपणासाठीदेखील वापरले जाऊ शकते. कारण मफलर हीसुद्धा स्टाइल स्टेटमेन्ट बनत चालली आहे. त्यामुळे पार्टीत जाताना थंडी असो वा नसो विविध रंगाचे किंवा चेक्स असलेले मफलर गळ्याभोवती लपेटून घेणे तरुणाई पसंत करू लागली आहे. प्लेनमध्येसुद्धा वुलन मफलर बाजारात उपलब्ध आहेत. प्रिंटेड मफलर फूल स्लीव्ह टी-शर्टवर परिधान केले जातात. वुलन मफलर थोडे महाग पडतात. मात्र खास पार्टी असेल तर त्यात आपला प्रभाव पाडण्यासाठी तेवढा खर्च करायला हरकत नाही. वुलन मफलरला दुसरा पर्याय स्कार्फचा आहे. स्कार्फ मध्ये चेक्सच्या स्कार्फला तरुण अधिक पसंती देतात.

स्टॅण्ड कॉलर
पार्टीसाठी एक चांगला पर्याय आहे, तो स्टॅण्ड किंवा चायनीज कॉलर शर्टचा. हे स्टॅण्ड कॉलर शर्ट बरेच लोकप्रिय होत आहेत. प्लेनमध्ये ब्राऊन, ब्लॅक, व्हाइट रंगातले हे शर्ट पार्टीसाठी चांगले आहेत. शायनिंगच्या शर्टसाठी चायनीज कॉलर असलेले कॉटन शर्ट पार्टीसाठी उत्तम पर्याय ठरत आहेत. 

Web Title: Youngsters ... go to the party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.