तुमची पर्स फॅशनेबल आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2017 06:30 PM2017-04-04T18:30:44+5:302017-04-04T18:30:44+5:30

पर्स, बॅग, हँडबॅग, झोळी, क्लच, पिशवी असे एक ना अनेक प्रकार आज उपलब्ध आहे. पण हा प्रत्येक प्रकार वापरण्याची विशिष्ट वेळ असते. विशिष्ट उद्देशानं जर यातलं काही वापरलं तर मग ते एकदम शोभून दिसतं.

Is your handbag fashionable? | तुमची पर्स फॅशनेबल आहे का?

तुमची पर्स फॅशनेबल आहे का?

googlenewsNext

- मोहिनी घारपुरे देशमुख

कुठे जायचं आहे? काय प्रसंग आहे?
हे पाहून आपण कपड्यांची फॅशन करतो.
पण सतत सोबत असलेल्या पर्सचं काय?
आपण केलेल्या फॅशनला आपल्या हातातली
पर्सही शोभायला हवी ना!

पर्स, बॅग, हँडबॅग, झोळी, क्लच, पिशवी असे एक ना अनेक प्रकार आज उपलब्ध आहे. पण हा प्रत्येक प्रकार वापरण्याची विशिष्ट वेळ असते. विशिष्ट उद्देशानं जर यातलं काही वापरलं तर मग ते एकदम शोभून दिसतं. त्याची फॅशनच होते म्हणाना.
करू ती फॅशन असा फंडा अनेकींचा असतो. पण असं असलं तरीही बेसिक फॅशन सेन्स उधळून लावला तर व्हायची ती गोची होणारच . म्हणूनच आपल्या लुकला कॅरी करेल असाच प्रकार निवडायला हवा. फॅशनेबल रहायचं तर ती शोभून दिसण्याची काळजीही घ्यायलाच हवी ना! पर्सेसच्याबाबतीतही असंच आहे.
क्लचेस - पार्टीवेअर आऊटफीट सोबत हे क्लचेस एकदम सुंदर दिसतात. हातात सहज कॅरी करता येऊ शकणाऱ्या क्लचेसची हल्ली खूपच चलती आहे. वर्कवाले क्लचेस पार्टीमध्ये तर जरा साधे, स्टायलिश क्लचेस कॅज्युअल मीटींग्ससाठी वापरता येतील. त्यातही अलिकडे मॅगझिन, न्यूजपेपर प्रिंट्सच्या क्लचेसची चलती आहे. तर पार्टीसाठी स्टोन्सवाले किंवा जरा ट्रेडीशनल आणि एथनिक लुकचे क्लचेस पसंत केले जातात.
बटवे - बटवे हे फक्त आजीबार्इंनाच शोभून दिसतात हा विचार फॅशन जगतात केव्हाच मागे पडला आहे. आपल्या पारंपरिक सणांच्या वेळी लहान मुली, बायका, तरूणीही खणाचे बटवे, पर्सेस कॅरी करताना दिसतात. हे बटवे दिसायलाअतिशय सुंदर दिसतात. विशेषत: पारंपरिक पोशाखाबरोबर बटवा कॅरी केल्यानं एक मस्त लूक येतो.
पर्सेस - कधीही कुठेही बाहेर पडायचं म्हणजे पर्स तर हवीच. पण त्यातही जरासा एथनिक सेन्स वापरला पाहिजे. फक्त एकच पर्स वापरणारी बाई अलिकडच्या काळात शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे किमान दोन आणि कमाल कितीही पर्सेस जवळ असल्या तरीही रोज आपल्या कपड्यांना आणि प्रसंगांना सूट होईल अशीच पर्स निवडणं अधिक शोभनीय ठरतं. रोज एकच पर्स कॅरी करणाऱ्याही अनेकजणी असतील पण स्वत:साठी थोडासा वेळ काढून ड्रेसला सूट होईल अशी आपल्या कलेक्शनमधली खास पर्स निवडावी.
सॅक - दुचाकीवरून फारवेळ फिरस्ती करणाऱ्या महिला आणि पुरूषांसाठीही आपलं सामान कॅरी करण्यासाठी सॅक हा एक अत्युत्तम पर्याय आहे. वापरायला रफ अँड टफ अशी सॅक पाठीवर अडकवली तर पंजाबी ड्रेस शक्यतो नकोच, त्याऐवजी जीन्स आणि स्मार्ट कुर्तीच अधिक खुलून दिसते.
झोला (झोळी) - काही वर्षांपूर्वी केवळ पत्रकारांच्याच खांद्यावर लटकणारी झोळी केव्हा फॅशन जगतात नवा लुक घेऊन आली आणि तरूणींच्या खांद्यावर लटकू लागली याचा पत्ताही लागला नाही. ही झोला पर्स विशेषत: धोती स्टाईल सलवार किंवा हॅरम पँट आणि कुर्तीसोबत खूपच छान दिसते.

 

Web Title: Is your handbag fashionable?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.