आपल्या मुलांना नटवताय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 05:54 PM2017-07-19T17:54:46+5:302017-07-19T17:54:46+5:30
..पण लक्षात ठेवा, ती पावडर तुमच्या चिमुकल्यांसाठी वीषही ठरू शकते!
- मयूर पठाडे
लहान मुलं, त्यातही मुली, किती क्यूट, गोड दिसतात ना! असंही लहान मुलांचं कोडकौतुक करण्यात आपल्याला शब्द पुरे पडत नाहीत आणि त्यांना नटवण्यात, सजवण्यातही आपण कुठलाच कद्रुपणा ठेवत नाही.. ही मुलं आहेत त्यापेक्षा आणखी सुंदर कशी दिसतील यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत असतो..
या मुलामुलींचे पालक जाऊ द्या, अगदी शेजारपाजारचे आणि येणारे जाणारेही त्यांचे अगदी लाड करीत असतात, त्यांना अनेक गोष्टी आणून देत असतात.
मुलींनाही नटायला आवडतंच. मग त्यासाठी पालकही त्यांना नवनवीन कपड्यांपासून तर मेकअपपर्यंत अनेक गोष्टींनी नटवत असतात. याच मेकअपमध्ये बऱ्याचदा असते ती चमचमणारी पावडर.
ही पावडणर लावल्यावर मुलं दिसतातही आणखीच गोबरी, गोड...
पण सावधान..
१- अॅसबेसटॉस हा अत्यंत घातक पदार्थ या पावडरमध्ये आढळून आला.
२- याशिवाय बेरिअम, क्रोमिअम, शिसं, सेलेनिअम.. यासारखेही आरोग्यावर मोठा दुष्परिणाम करणारे पदार्थ या पावडरमध्ये होते.
३- खास लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेली ही पावडर म्हणजे जणू एक जहाल वीषच आहे असं मत प्रयोगशाळेच्या संचालकांनी व्यक्त केलं.