जांभूळ खाल्ल्यानं होतात 17 फायदे. मधुमेह, हदयविकार, पोटाचे विकार आणि त्वचाविकारावर जांभूळ आहे गुणकारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2017 06:31 PM2017-05-30T18:31:33+5:302017-05-30T18:31:33+5:30
जांभळाचे 17 आरोग्यदायी फायदे आहेत. जांभूळ खाल्ल्यानंही आपण फीट राहू शकतो.
- मृण्मयी पगारे
मे, जूनचा काळ म्हणजे बाजारात जांभळं मिळतातंच. जांभूळ म्हणजे जंगली फळ. पण या फळाकडे फक्त सिझनल फळ म्हणून पाहू नका. दोन अडीच महिन्यात भरपूर जांभळं खाऊन घ्या. आणि पुढे वर्षभर जांभळाच्या बिया, झाडाची साल, पानं, ज्युसेसचा आणि सिरपचा उपयोग करा. कारण जांभळाचे 17 आरोग्यदायी फायदे आहेत. जांभूळ खाल्ल्यानंही आपण फीट राहू शकतो.
जांभूळ खाऊन फीट होण्याची संधी मग दवडायची कशाला?
15) जांभळाचं ज्यूस पाण्यात घालून ते पाणी त्वचाविकारात त्वचेला लावल्यास फायदेशीर ठरतं.
16) जांभळाच्या ज्यूसचा उपयोग अशक्तपणा, अॅनेमिया, यावरही होतो. तसेच जांभळाच्या ज्यूसच्या नियमित सेवनानं स्मरणशक्ती वाढते.
17) जांभूळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असल्यानं जांभूळ खाल्ल्यानं हदयविकारापासून दहा हात दूर राहाता येतं. जांभूळ खाल्ल्यानं हदय सशक्त होतं आणि हायपरटेन्शन होत नाही.