शेवग्याच्या दोन रेसिपी ज्याद्वारे शरीराला मिळतात अनेक फायदे, जाणून घ्या कशा बनवाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 12:08 PM2024-09-09T12:08:26+5:302024-09-09T12:17:39+5:30
Drumstick Benefits :आयुर्वेदानुसार, शेवग्याच्या शेंगा आणि पाने ३०० पेक्षा जास्त आजारांवर रामबाण उपाय ठरतात. अशात आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगांचे फायदे सांगणार आहोत.
Drumstick Benefits : शेवग्याच्या शेंगांची भाजी भरपूर लोक आवडीने खातात. या शेंगा वेगवेगळ्या पदार्थांमध्येही वापरल्या जातात. या खायला टेस्टी तर लागतातच सोबतच या शेंगांचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. आयुर्वेदात शेवग्याच्या शेंगांना आणि शेवग्याच्या पानांना फार महत्व आहे. आयुर्वेदानुसार, शेवग्याच्या शेंगा आणि पाने ३०० पेक्षा जास्त आजारांवर रामबाण उपाय ठरतात. अशात आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगांच्या काही रेसिपी सांगणार आहोत ज्याने तुम्हाला खूप फायदे मिळतील.
शेवग्यामधील पोषक तत्व
शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, अमीनो अॅसिड, बीटा कॅरेटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम, कार्बोहाइड्रेट, फॉस्फोरस, जिंकसारखे मिनरल्स आणि वेगवेगळे फीनॉलिक असतात. तसेच या शेंगांमध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B१, व्हिटॅमिन-B२, व्हिटॅमिन-B३, व्हिटॅमिन-B४, व्हिटॅमिन-B६, व्हिटॅमिन-B९ आणि व्हिटॅमिन-C भरपूर असतात. या शेंगांचं सेवन केल्यावर शरीराला काय फायदे मिळतात जे जाणून घेऊ.
शेवग्याच्या शेंगांचं सूप पिण्याचे फायदे
शेवग्याच्या शेंगा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि आतड्या साफ करण्यासाठी ओळखल्या जातात. याने लिव्हर, किडन्या आतून स्वच्छ होतील. त्यासाठी शेवग्याच्या शेंगांच सूप तुम्ही नेहमी प्यायला हवं. यापासून शरीराचा इन्फेक्शनपासून आणि वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होतो. तसेच याच्या सेवनाने शरीरात पांढऱ्या रक्तपेशीही वाढतात. ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा समस्याही होत नाहीत. शेवग्याच्या शेंगांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होते. ज्यामुळे तुम्हाला हृदय रोगांचा धोका कमी होतो.
सूप कसं कराल तयार?
शेवग्याच्या पानांचा चहा
शेवग्याच्या पानांपासून तयार केलेला चहा तुम्हाला कर्करोग, कमकुवत हाडे, अशक्तपणा, अल्झायमर, यकृत संबंधित रोग, कमकुवत प्रतिकारशक्ती, आतडे आरोग्य, वृद्धत्वविरोधी आणि त्वचेशी संबंधित समस्यांशी लढण्यास मदत होते.
शेवग्याचा चहा कसा बनवाल?
शेवग्याचा चहा बनवायला खूप सोपा आहे. यासाठी तुम्हाला फार कष्ट करण्याची गरज नाही. कारण शेवग्याचं पावडर आजकाल ऑनलाइन आणि किराणा दुकानात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. तुम्हाला फक्त उकळत्या पाण्यात ही पावडर योग्य प्रमाणात घालावी लागेल. नंतर तुम्ही या चहाचा आनंद घेऊ शकता.