दिवाळीच्या धावपळीत तब्येत बिघडली असेल, तर 'या' ५ ड्रिंक्सने बॉडी करा डिटॉक्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 02:56 PM2024-11-02T14:56:42+5:302024-11-02T15:05:51+5:30
Body Detox Drinks : आज आम्ही तुम्हाला तब्येत ठणठण करणाऱ्या अशाच ५ डिटॉक्स ड्रिंकबाबत सांगणार आहोत. यांचं सेवन करून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत मिळेल.
Body Detox Drinks : दिवाळीत कामाच्या धामधुमीत आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं जात नाही. ज्यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. अशात तुम्ही काही डिटॉक्स ड्रिंकचं सेवन करून तब्येत पुन्हा ट्रॅकवर आणू शकता. आज आम्ही तुम्हाला तब्येत ठणठण करणाऱ्या अशाच ५ डिटॉक्स ड्रिंकबाबत सांगणार आहोत. यांचं सेवन करून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत मिळेल.
शरीर कसं कराल डिटॉक्स
जिऱ्याचं पाणी
जिऱ्याचं पाणी शरीर डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर ठरतं. याच्या नियमित सेवनाने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे भूकही कंट्रोल होते. यासाठी रात्री १ चमचा जिरे एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हेच पाणी कोमट करून सेवन करा.
लिंबू आणि आल्याचं पाणी
लिंबू आणि आल्याच्या पाण्याचं सेवन करून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि आल्याच्या एक तुकटा बारीक करून टाका. या पाण्याचं सेवन केल्याने फायदा मिळेल.
दालचीनीचं पाणी
दालचीनीने जेवणाची टेस्ट तर वाढतेच, सोबतच यात अनेक औषधी गुणही असतात. रोज रात्री झोपण्याआधी हे पाणी कोमट करून सेवन करावं. याने पचन तंत्र चांगलं राहतं आणि वजन कंट्रोल ठेवण्यासही मदत मिळते.
सफरचंद आणि दालचीनी
या दोन्ही गोष्टींच्या मिश्रणाने शरीरातील सगळे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. तसेच यातील पोषक तत्वांमुळे शरीराची इम्यूनिटी सुद्धा वाढते. इतकंच नाही तर याने ब्लड शुगरही कंट्रोल राहते.