आहारातील 'हे' 5 पदार्थ रक्त शुद्ध करण्यासाठी करतात मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 03:13 PM2019-05-21T15:13:12+5:302019-05-21T15:13:44+5:30
रक्त शुद्ध करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक पदार्थांबाबत सांगण्यात आले आहे. आपण दररोज जो आहार घेतो त्यामध्ये सोडिअम, यूरिया यांसारखी घातक तत्वही असतात.
रक्त शुद्ध करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक पदार्थांबाबत सांगण्यात आले आहे. आपण दररोज जो आहार घेतो त्यामध्ये सोडिअम, यूरिया यांसारखी घातक तत्वही असतात. जी आपल्या रक्तामध्ये मिसळून जातात आणि अनेक आजारांचा धोरका वाढवतात. जर तुमच्या किडन्यांचे आरोग्य उत्तम असेल तर शरीरातील घातक आणि विषारी घटक शरीरातून बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. रक्त अशुद्ध असल्यामुळे त्वचेच्या समस्या, पिंपल्स, डाग आणि किडनीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे किडन्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासोबतच रक्त शुद्ध ठेवणंही अत्यंत आवश्यक असतं.
शिमला मिरची
शिमला मिरची फक्त रक्त आणि किडन्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नाही तर पचनक्रिया सुरळीत ठेवून रक्तप्रवाह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते.
शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि सी मुबलक प्रमाणात असतात. त्याचबरोबर यामध्ये आयर्न, कॅल्शिअम आणि फॉस्फोरस यांसारखी खनिज तत्व असतात.
जेवल्यानंतर बडिशोप फायदेशीर
बडिशोप रक्त स्वच्छ करण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. दररोज बडिशोपचा वापर केल्यामुळे रक्त डिटॉक्सिफाय होतं आणि अशुद्ध घटक शरीरातून बाहेर निघून जातात.
दररोज जेवल्यानंतर 5 मिनिटांनी एक चमचा बडिशोपमध्ये अर्धा चमचा खडीसाखर एकत्र करून त्याचे सेवन करा.
रक्त स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणी
पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी सकाळी कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबू एकत्र करून त्याचं सेवन करा. हे मिश्रण पोट स्वच्छ करण्यासाठी मदत करतं. हे लिव्हरमधील एंजाइमचं उत्पादन वाढवतं. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
लिंबामध्ये असलेलं अॅसिड पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत करते.
लसूण आलं आणि कांदा नक्की खा
जास्तीत जास्त भारतीय घरांमध्ये जेवण तयार करण्यासाठी लसूण, आलं आणि कांद्याचा वापर करण्यात येतो. पण हे तीन पदार्थ शिजल्यानंतर तेवढे फायदेशीर राहत नाहीत. जेवढे कच्चे असतात, तेवडे हे पदार्थ फायदेशीर ठरतात. त्यामुळे आपल्या दररोजच्या जेवणामध्ये थोडासा कच्चा लसूण, आलं आणि कांदा एकत्र करा.
तुम्ही फळं आणि भाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या सलाडमध्येही हे पदार्थ एकत्र करून खाऊ शकता. हे रक्त वेगाने स्वच्छ करतात आणि नवीन रक्तेशी तयार करण्यासाठी मदत करतात.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.