उन्हाळ्यात खाण्यासाठी टेस्टी अन् हेल्दी फ्रुड्स; एकदा खाऊन बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 07:03 PM2019-05-16T19:03:22+5:302019-05-16T19:04:34+5:30

आपल्यापैकी अनेकजण खाण्या-पिण्याचे शौकीन असतात. ज्यांना 'फूडी' म्हणून ओळखलं जातं. अशा व्यक्तींना प्रत्येक सीझनमध्ये काही खास पदार्थ खाण्याची इच्छा होते.

5 most popular and tasty summer special foods in india everyone must have | उन्हाळ्यात खाण्यासाठी टेस्टी अन् हेल्दी फ्रुड्स; एकदा खाऊन बघाच!

उन्हाळ्यात खाण्यासाठी टेस्टी अन् हेल्दी फ्रुड्स; एकदा खाऊन बघाच!

Next

(Image Credit : lifealth.com)

आपल्यापैकी अनेकजण खाण्या-पिण्याचे शौकीन असतात. ज्यांना 'फूडी' म्हणून ओळखलं जातं. अशा व्यक्तींना प्रत्येक सीझनमध्ये काही खास पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशा व्यक्तींना देश-विदेशातील कोणत्याही कोपऱ्यात गेल्या तरिही तेथील खास आणि पारंपारिक पदार्थ चाखण्याची इच्छा असते. सध्या उन्हाळ्याचं सीझन सुरू आहे. जर तुम्हीही फूडी असाल आणि या सीझनचा पूर्ण आनंद घेण्याची इच्छा असेल तर हे फ्रुट्स आणि यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ चाखायला विसरू नका. 

1. कलिंगड 

चविष्ट आणि मुबलक प्रमाणात पाण्याचा स्त्रोत असणारं कलिंगड तुम्ही खाऊ शकता. कलिंगड खाण्यासाठी चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. खाण्यासाठी अत्यंत हलकं असणारं कलिंगड उन्हाळ्यात सन स्ट्रोकपासून सुटका करण्यासाठी मदत करतं. तुम्ही वॉटरमेलन शेक, ज्यूस, आइस्क्रिम, पंच करून पिऊ शकता. 

2. काकडी 

काकडी पाहायला गेलं तर सलाडचा भाग आहे, परंतु उन्हाळ्यामध्ये तुम्ही नेहमी लोकांना काकडी कापून त्यावर थोडंसं लिंबू पिळून खाताना पाहिलं असेल. उन्हाळ्यात पोटाच्या समस्या दूर ठेवण्यासाठी काकडी मदत करते. तुम्ही काकडीचा ज्यूस करून पिऊ शकता. 

3. टोमॅटो

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे फळ आहे की भाजी? यावरही अनेक मतभेद आढळून येतात. पण हे काहीही असलं तरिही हे आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे. त्यामुळे सलाडप्रमाणे खा. यामध्ये असणारे अॅन्टीऑक्सिडंट्स अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात. 

4. आंबा 

आंबा म्हणजे फळांचा राजा आणि उन्हाळ्याचा बादशाह असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. उन्हाळ्यामध्ये लोक आंब्याचा मिल्कशेक पिणं पसंत करतात. याशिवाय आंब्याची भाजी, चटणी आणि इतर चविष्ट मिठाया तयार करण्यात येतात. आंब्याच्या फायद्यांबाबत बोलायचे झाले तर, आंबा वजन कमी करण्यासाठी, पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. यामध्ये असलेलं पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स शरीराचं डिहायड्रेशनपासून रक्षण करून ब्लोटिंगची समस्या दूर करतात. 

5. स्ट्रॉबेरी 

फक्त चव किंवा सुगंध नाही तर स्ट्रॉबेरी आरोग्य आणि सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरते. जर तुम्हालाही स्ट्रॉबेरी आवडत असेल तर उन्हाळ्यामध्ये या फळाचा नक्की समावेश करा. यामध्ये असलेले अॅन्टीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स उत्तम आरोग्यासाठी आणि चेहऱ्यावरील रिंकल्स दूर ठेवण्यासाठी मदत करतात.
 
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: 5 most popular and tasty summer special foods in india everyone must have

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.