मुंबईच्या आसपास आवर्जून भेट द्यावे असे 5 ढाबे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 04:21 PM2018-04-02T16:21:23+5:302018-04-02T16:25:29+5:30

या ढाब्यांवर तुम्हाला नक्कीच काही वेगळं आणि लक्षात राहिल असं मिळेल. वेगळ्या अनुभवासाठी एकदा या ढाब्यांवर जाऊन या....

5 Must Visit Dhabas in and around Mumbai | मुंबईच्या आसपास आवर्जून भेट द्यावे असे 5 ढाबे!

मुंबईच्या आसपास आवर्जून भेट द्यावे असे 5 ढाबे!

Next

मुंबई आणि खाण्याचे शौकीन हे खरंतर समीकरणच...पण तुम्ही जर मुंबईतील हॉटेल्समधील जेवण करुन कंटाळले असाल आणि तुमचा कुठेतरी बाहेर जाऊन वेगळं काही खाण्याचा मुड होत असेल. तर आम्ही तुमच्यासाठी मुंबईच्या आजूबाजूबच्या 5 खास ढाब्यांची माहिती देणार आहोत. या ढाब्यांवर तुम्हाला नक्कीच काही वेगळं आणि लक्षात राहिल असं मिळेल. वेगळ्या अनुभवासाठी एकदा या ढाब्यांवर जाऊन या....

1) शालीमार ढाबा

मुंबई-नाशिक हायवेवरील शांग्रीला वॉटर पार्कजवळील हा ढाबा खाण्याच्या शौकीनांसाठी स्वर्ग मानला जातो. जर तुम्ही इथे गेले नसाल तर एकदा जाऊन या. एकदा जाऊन आल्यावर पुन्हा पुन्हा जाल. हा ढाबा नॉनव्हेजसाठी चांगलाच प्रसिध्द आहे. मुंबईतील लोक खासकरुन इथे नॉनव्हेज खाण्यासाठीच येतात. 

पत्ता - शांग्रीला वॉटर पार्कसमोर, मुंबई-नाशिक हायवे, भिवंडी, कल्याण, मुंबई
वेळ - दुपारी 12 ते 3, सायंकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत
दोघांच्या जेवणाचा साधारण खर्च 40 रुपये, (इथे केवळ कॅश घेतात.)

2) मेझबान ढाबा 

मुंबई-पुणे रोडवरील हा ढाबा वेगवेगळ्या पदार्थांसाठी प्रसिध्द आहे. हा नॉनव्हेज आणि व्हेजसाठीही प्रसिध्द आहे. य़ेथील कुरकुरे कबाब, पालकसाठी यासाठी हा ढाबा प्रसिध्द आहे.

पत्ता - बिसमिल्लाह टिंबर मार्ट, हैदराबाद एग सेंटरजवळ, मुंबई-पुणे रोड, मुंब्रा, ठाणे.
वेळ - सायंकाळी 6 पासून ते रात्री 1.30 वाजेपर्यंत
दोघांच्या जेवणाचा खर्च साधारण 350 रुपये.(इथे केवळ कॅश घेतात)

3) पारसी ढाबा - 

पारसी हॉटेल्समध्ये तुम्ही अनेकदा गेला असाल. पण कधी तुम्ही पारसी ढाब्यावर गेला नाही ना..? मग तुमच्यासाठी पारसी स्टाईलच्या खास डिश खाण्याची संधी आहे. ठाण्यात हे हॉटेल आहे. 

पत्ता - नरीमन नगर, वरवडा गाव, ठाणे
दोघांच्या जेवणासाठी साधारण 600 रुपये खर्च.

4) प्रितम दा ढाबा -

पंजाबमधील गावांचा अनुभव घ्यायचा असेल तर दादरमधील हा ढाबा चांगला आहे. त्याहूनही खास इथलं जेवण आहे. इथली खासियत म्हणजे लाईव्ह बॅंडवर तुम्ही गझल आणि हिंदी गाण्यांचा आनंद घेऊ शकता.

पत्ता - 32, धर्मपुत्रा, प्रितम इस्टेट, दादर टीटी फ्लायओव्हरजवळ, डॉ.आंबेडकर रोड, दादर ईस्ट, मुंबई.
वेळ - सायंकाळी 7.30 ते रात्री 12 पर्यंत

5) गुरु दा ढाबा -

ज्यांना आईच्या हातच्या जेवणाची सतत आठवण येत असेल आणि त्या नादात कुठेही काहीही खात असेल तर अशांसाठी हा ढाबा खास आहे. इथे स्वस्तात चांगलं जेवण मिळतं. 

पत्ता - बिल्डींग नंबर, 2, 101, कामधेनू शॉपिंग सेंटर, अंधेरी वेस्ट, मुंबई.
वेळ - सकाळी 11 ते दुपारी 12 पर्यंत, तर सायंकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत.
 

Web Title: 5 Must Visit Dhabas in and around Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न