या ७ गोष्टींची काळजी घेतल्यास बेकार होणार नाही फ्रिज!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 12:56 PM2018-08-27T12:56:55+5:302018-08-27T12:58:05+5:30
अनेकांना अवेळी खर्च करुन नवा फ्रिज घ्यावा लागतो. पण काही आम्ही तुमचा नव्या फ्रिजचा खर्च वाचवण्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.
अनेकदा काही लोकांचा फ्रिज हा २ ते ३ वर्षात खराब होतो. अनेकांना असं वाटतं की त्यांना चुकीच्या फ्रिजची निवड केली आहे. पण मुळाच फ्रिजची निवड चुकलेली नसते तर फ्रिज ठेवण नीट केलेली नसल्याने तो खराब होतो. त्यामुळे अनेकांना अवेळी खर्च करुन नवा फ्रिज घ्यावा लागतो. पण काही आम्ही तुमचा नव्या फ्रिजचा खर्च वाचवण्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.
१) फ्रिज घरात कुठेही ठेवताना या गोष्टीची काळजी घ्या की, त्याचं व्हेंटिलेशन चांगल्याप्रकारे होत आहे. यासाठी फ्रिज भींतीपासून दोन हात दूर ठेवा.
२) फ्रिज चांगला ठेवण्यासाठी गरजेचे आहे की, त्याला गरम जागेपासून दूर ठेवा. फ्रिजला सूर्याचा प्रकाश, ओव्हन, रेडिएटर आणि चुलीपासून दूर ठेवा.
३) अनेकजण फ्रिजमध्ये सगळेच पदार्थ ठेवून फ्रिज गच्च भरुन ठेवतात. असे केल्याने फ्रिज लवकर खराब होऊ शकतो. फ्रिजमध्ये हवेसाठी काही जागा ठेवावी.
४) फ्रिजमधून सामान काढताना किंवा पाणी पिताना अनेकजण दरवाजा उघडा ठेवतात. अशात फ्रिजमधील सगळी हवा बाहेर निघून जाते. यानेही फ्रिज खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्रिजचा दरवाजा नेहमी नेहमी उघडू नका.
५) अनेकजण गरम दूध किंवा भाजी, डाळ सारखे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतात. असे केल्याने फ्रिजमधील तापमानावर प्रभाव पडतो. त्यामुळे काहीही फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी आधी ते थंड होऊ द्या.
६) फ्रिजचं सील नेहमी योग्य असायला हवं. हे तपासण्यासाठी फ्रिजमध्ये एक फ्लॅशलाइट ठेवा आणि दरवाजा बंद करा. जर सील बेकार झालं असेल तर लाइटचा प्रकाश बाहेर येणार. अशावेळी लगेच दुरुस्ती करा.
७) फ्रिजची कॉइल रोज जरी जमले नाही तर आठवड्यातून एकदा स्वच्छ करा. जर त्यावर धूळ, कचरा बसला तर ते बेकार होऊ शकतं.