मॅग्नेशिअमच्या कमतरतेने त्रस्त आहेत 75% भारतीय; 'या' पदार्थांच्या सेवनाने होईल फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 04:21 PM2019-05-12T16:21:15+5:302019-05-12T16:22:57+5:30

शरीराच्या विकासाठी आणि निरगी आरोग्यासाठी अनेक पोषक तत्वांची गरज असते. ज्यामध्ये कॅल्शिअम, आयर्न, झिंक, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम इत्यादी तत्वांचा समावेश होतो.

75 percent indians suffering from magnesium deficiency these food items will help | मॅग्नेशिअमच्या कमतरतेने त्रस्त आहेत 75% भारतीय; 'या' पदार्थांच्या सेवनाने होईल फायदा

मॅग्नेशिअमच्या कमतरतेने त्रस्त आहेत 75% भारतीय; 'या' पदार्थांच्या सेवनाने होईल फायदा

शरीराच्या विकासाठी आणि निरगी आरोग्यासाठी अनेक पोषक तत्वांची गरज असते. ज्यामध्ये कॅल्शिअम, आयर्न, झिंक, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम इत्यादी तत्वांचा समावेश होतो. मॅग्नेशिअम एक असं तत्व आहे, ज्याची कमतरता 75% पेक्षा जास्त लोकांमध्ये आढळून येते. पण तुम्हाला माहीत आहे का की, आपल्या शरीरासाठी मॅग्नेशिअम कितपत गरजेचं असतं? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, मॅग्नेशिअम शरीरामध्ये 300 पेक्षाही जास्त बायोकेमिकल रिऐक्शन्समध्ये मदत करतात. मेंदू, हृदय, डोळे, इम्यून सिस्टम, नर्व्स आणि मसल्सचं काम व्यवस्थित चालण्यासाठी मॅग्नेशिअमची गरज असते. असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांचा आहारात समावेश केल्याने मॅग्नेशिअमची कमतरता भरून काढण्यास मदत होते. जाणून घेऊया त्या पदार्थांबाबत...

काजू आहेत फायदेशीर...

दररोज 10 ते 12 काजू खाल्याने फायदा होतो. 28 ग्रॅम काजूमध्ये आपल्याला दररोज आवश्यक असणारं 20% मॅग्नेशिअम असतं. याव्यतिरिक्त यामध्ये पोटॅशिअम आणि आयर्नची प्रमाण अधिक असतं. काजूचं सेवन करण्यामुळे शरीरामध्ये एनर्जी तयार होते. ज्यामुळे आळस आणि थकवा दूर होतो. 

बदाम ठरतं आरोग्यदायी...

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही दररोज 8 ते 10 बदाम खात असाल तर तुमच्या हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत होते. बदामही मॅग्नेशिअमचा उत्तम स्त्रोत आहे. 28 ग्रॅम बदामांमध्ये दररोज लागणारं जवळपास 19 टक्के मॅग्नेशिअम मिळतं. याव्यतिरिक्त 6 ग्रॅम प्रोटीन आणि व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात मिळत. 

भोपळ्याच्या बिया परिणामकारक...

भोपळ्याच्या बियां भाजून आणि त्यार मीठ टाकून खाणं फायदेशीर ठरतं. 28 ग्रॅम भोपळ्याच्या बियांमधून तुम्ही आपल्या दैनिक गरजेच्या 18 टक्के मॅग्नेशिअम मिळवू शकता. यामध्ये फायबरही मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे पोटासाठीही हे फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर भोपळ्याच्या बियांना आयर्नचा उत्तम स्त्रोत समजला जातो. 

अक्रोड मेंदूसाठी लाभदायक...

अक्रोडचं सेवन मेंदूसाठी उत्तम स्त्रोत मानणयात येतो. 28 ग्रॅम अक्रोडमध्ये आपल्या दैनिक गरजेच्या 11 टक्के मॅग्नेशिअम असतं. याव्यतिरिक्त अक्रोड ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि इतर उत्तम अॅन्टीऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहे. 

पिस्ता डोळ्यांसाठी आवश्यक...

पिस्त्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. 28 ग्रॅम पिस्त्याच्या सेवनाने दैनिक गरजेच्या 8 टक्के मॅग्नेशिअम मिळतं. याव्यतिरिक्त पिस्त्यामध्ये ल्यूटिन आणि जियजैन्थिन नावाची दोन तत्व असतात. जी डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: 75 percent indians suffering from magnesium deficiency these food items will help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.