अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितले शिंगाडे खाण्याचा जबरदस्त फायदे, वाचाल तर रोज खाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 01:10 PM2024-11-26T13:10:07+5:302024-11-26T13:18:39+5:30
अभिनेत्री भाग्यश्रीने नुकताच एक व्हिडीओ शेअर करून शिंगाडे खाण्याची एक पद्धत सांगितली आहे आणि या फळाचे फायदेही सांगितले.
Water Chestnut Benefits For Health: हिवाळ्यात वेगवेगळ्या फळांसोबतच शिंगाडेही मिळतात. या दिवसात बरेच लोक आवडीने हे फळ खातात. हिवाळ्यात शिंगाडे उकडून खाल्ले जातात. यांची टेस्ट तर चांगली लागतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. शिंगाड्यामुळे हिवाळ्यात शरीर आतून गरम राहतं आणि अनेक आजारांपासूनही बचाव होतो.
अभिनेत्री भाग्यश्री जी आपल्या हेल्दी डाएटसाठी ओळखली जाते. भाग्यश्री देखील शिंगाडे आवडीने खाते. भाग्यश्रीने नुकताच एक व्हिडीओ शेअर करून शिंगाडे खाण्याची एक पद्धत सांगितली आहे आणि या फळाचे फायदेही सांगितले.
शिंगाडे खाल्ल्याने आरोग्यावर काय प्रभाव पडतो?
वजन होईल कमी
शिंगाडे खाऊन तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळू शकते. शिंगाडे एक लो-कॅलरी फूड आहे आणि यात फॅटचं प्रमाण अजिबात नसतं. अशात तुम्ही शिंगाडे खाल्ले तर तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यास मदत मिळेल.
डायजेस्टिव पॉवर वाढते
ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या होते त्यांच्यासाठी शिंगाडे खूप फायदेशीर असतात. शिंगाडे खाल्ल्याने पचन तंत्राचं काम आणखी चांगल्या पद्धतीने होतं. यात डायटरी फायबर भरपूर असतं जे पचनक्रिया चांगली होण्यास मदत करतं. अशात तुम्हाला बद्धकोष्ठतेचीही समस्या होत नाही.
त्वचेसाठी फायदेशीर
शिंगाड्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे शिंगाडे खाल्ल्याने त्वचेलाही अनेक फायदे मिळतात. व्हिटॅमिन सी मुळे त्वचेमध्ये कोलाजन अधिक प्रमाणात तयार होतं आणि याने त्वचा लवचिक बनते. तसेच त्वचा टाइट आणि तरूण दिसते.
डायबिटीसमध्ये फायदेशीर
हाय ब्लड शुगरमुळे तुम्ही अनेक गोष्टींचं कमी सेवन करत असाल तर शिंगाडे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. शिंगाडे हे एक लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं फळ आहे आणि याच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही.