जेवण झाल्यावर लगेच 'ही' कामे केल्याने पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 02:56 PM2018-12-17T14:56:33+5:302018-12-17T14:59:56+5:30
अनेकांना जेवण झाल्यावर लगेच काहीतरी खाण्याची सवय असते. तसेच स्वत:ला स्लिम करण्यासाठी काही लोक जेवणानंतर लगेच असे काही पदार्थ खातात जे त्यांनी खायला नको.
अनेकांना जेवण झाल्यावर लगेच काहीतरी खाण्याची सवय असते. तसेच स्वत:ला स्लिम करण्यासाठी काही लोक जेवणानंतर लगेच असे काही पदार्थ खातात जे त्यांनी खायला नको. पण हे पदार्थ तुमचं आरोग्य बिघडवू शकतात. या गोष्टी सतत केल्यातर तुम्हाला याचे परिणाम पुढे जाऊन भोगावे लागू शकतात.
अनेकांना जेवण झाल्यावर लगेच स्मोकिंग करण्याची सवय असते. पण असे केल्याने त्यांची पचनक्रिया बिघडते. केवळ स्मोकिंगच नाही तर तंबाखू खाणेही हानिकारक आहे. स्मोकिंग आणि तंबाखूमुळे तोंडाला फोडं येणे आणि कॅन्सरचा धोका अधिक असतो.
स्मोकिंग आणि तंबाखूमुळे गॅस्ट्रिक आणि अॅसिडीक समस्या होते. इतकेच नाही तर पुढे जाऊन याने अनेकप्रकारचे गंभीर आजारही होतील. तसेच जे लोक जेवण झाल्यावर लगेच झोपायला जातात. त्यांचं जेवण योग्यप्रकारे पचन होत नसल्याने त्यांना गॅस आणि आतड्यांमध्ये इन्फेक्शनसारख्या समस्या होतात.
जेवण केल्यावर लगेच खाऊ नका फळं
जर तुम्हाला वाटत असेल की, जेवण झाल्यावर फळं खाणं चांगलं असतं तर तुम्ही चूक आहात. खासकरुन जेवण झाल्यावर लगेच फळं खाऊ नये. याने पोटातील अन्न दुषित होण्याची शक्यता असते. याच कारणामुळे हा सल्ला दिला जातो की, जेवण केल्यावर कमीत कमी एक तासांच्या अंतराने फळं खावे.
एक तासांनंतर चहा
चहाच्या पानांमध्ये अॅसिडचं प्रमाण आढळतं. याने आहारातीन प्रोटीनचं नुकसान होतं. ज्यामुळे अन्न पचण्यासाठी अडचण येते. अशात जर तुम्हाला चहा घ्यायचाच असेल तर तुम्ही जेवणानंतर १ तासांच्या अंतराने घ्यावा.
तसेच जेवण केल्यावर लगेच आंघोळ करण्यालाही चुकीचं मानलं जातं. जेवण केल्यावर लगेच आंघोळ केल्याने शरीरात रक्तप्रवाह वाढतो. याने पोटाच्या चारही बाजून रक्ताचं प्रमाण कमी होतं. यामुळे पचनक्रिया कमजोर होते.