पुरी-भाजी खाल्याने मिळते खेळाडूप्रमाणे एनर्जी; जाणून घ्या कशी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 11:56 AM2019-10-21T11:56:55+5:302019-10-21T12:03:54+5:30
भारतीय खाद्यपदार्थ टेस्टी असण्यासोबतच त्यामध्ये न्यूट्रिशनल वॅल्यू अधिक असतात. पण हे योग्य वेळी आणि मर्यादित प्रमाणात खाणं आवश्यक असतं. अनेकदा आपण थोरामोठ्यांच्या तोंडून एक वाक्य नेहमी ऐकत असतो.
भारतीय खाद्यपदार्थ टेस्टी असण्यासोबतच त्यामध्ये न्यूट्रिशनल वॅल्यू अधिक असतात. पण हे योग्य वेळी आणि मर्यादित प्रमाणात खाणं आवश्यक असतं. अनेकदा आपण थोरामोठ्यांच्या तोंडून एक वाक्य नेहमी ऐकत असतो. अति तिथे माती... हे वाक्य प्रत्येक कामामध्ये लागू होतं जर एखादी गोष्ट अति केली तर त्यामुळे फायदा होण्याऐवजी तोटेच होतात. त्यामुळे एखाद्या पदार्थाचं मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला फायदे होतात.
काही फूड कॉम्बिनेशन लोकांना फक्त टेस्टी असतात म्हणून आवडतात. जसं डाळ-भात. परंतु न्यूट्रिशनबाबत हे फार पुढे असतात. असंच एक फूड कॉम्बिनेशन आहे. आलू-पुरी म्हणजेच, बटाट्याची भाजी आणि पुरी. या पदार्थाबाबत रिसर्चमधून एक खुलासा करण्यात आला आहे. जाणून घेऊया काय म्हणतो, रिसर्च...
पुरी भाजी सर्वात भारी
एका रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे की, पुरी भाजी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये न्यूट्रिशनल वॅल्यू अधिक असतात. एखाद्या बाजारात मिळणाऱ्या अॅथलिट्सची एनर्जी वाढविणाऱ्या महागड्या कार्बोहायड्रेट जेलमुळेजेवढे फायदे होतात. तेवढेच फायदे पुरी भाजी खाल्यानेही होतात.
शरीराला ऊर्जा देण्यासाठी टेस्टी ऑप्शन्स
अमेरिकेतील इलिनॉयस यूनिवर्सिटीमध्ये हा रिसर्च करण्यात आला. यामध्ये शरीरामध्ये ऊर्जा वाढवणाऱ्या काही टेस्टी पदार्थांवर रिसर्च करण्यात आला.
कमी पैशात जास्त एनर्जी
रिसर्चमध्ये सांगितल्यानुसार, बटाटा फार कमी पैशात मिळतात. तसेच हा शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांचा आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम स्त्रोत आहे. तसेच कार्बोहायड्रेट जेलमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असतं. या तुलनेमध्ये बटाटा शर्यतीत भाग घेणाऱ्या अॅथलिट्ससाठी एखाद्या इंधनाप्रमाणे काम करतो.
को-ऑथर काय सांगतात?
रिसर्च पेपरचे को-ऑथर निकोलस बर्ड असं सांगतात की, त्यांच्या संशोधनाचा उद्देश अॅथलिट्सना ऊर्जा मिळण्यासाठी विविध पर्याय शोधणं हा आहे.
सायकिलिस्ट्सवर केलं गेलं ट्राय
निकोलस यांनी सांगितलं की, रिसर्चसाठी सायकिलिस्ट्सच्या दोन टिम करण्यात आल्या दोन्ही टीम्समधील कार्बोहाइड्रेटच्या सोर्सेजमध्ये फरक होता. एका टिमने जेल घेतलं आणि दुसऱ्या टिमने बटाट्याची भाजी आणि पुरीचं सेवन केलं. परंतु, दोन्ही टिमच्या एनर्जी लेव्हलमध्ये थोडासाही फरक नाही दिसला.
(टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून त्या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)