हिवाळ्यात बीट खायचं की नाही? जाणून घ्या काय होतात फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 12:37 PM2024-10-16T12:37:34+5:302024-10-16T13:05:04+5:30

Beetroot Juice Benefits : हिवाळ्यात बिटाचं सेवन करणं फार फायदेशीर मानलं जातं. कारण बीट हे एक सुपरफूड मानलं जातं. यात भरपूर प्रमाणात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात.

Amazing health benefits of eating beetroot in winter | हिवाळ्यात बीट खायचं की नाही? जाणून घ्या काय होतात फायदे!

हिवाळ्यात बीट खायचं की नाही? जाणून घ्या काय होतात फायदे!

Beetroot Juice Benefits : बिटाचं सेवन भरपूर लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. बिटाचा सेवन लोक सलाद म्हणूनही करतात. याची टेस्ट तर चांगली लागतेच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. जे सामान्यपणे लोकांना माहीत नसतात. हिवाळ्यात बिटाचा ज्यूसही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. अशात आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात बिटाचं सेवन केल्याने काय काय फायदे मिळतात हे सांगणार आहोत.

हिवाळ्यात बीट खायचं की नाही?

एक्सपर्टनुसार, हिवाळ्यात बिटाचं सेवन करणं फार फायदेशीर मानलं जातं. कारण बीट हे एक सुपरफूड मानलं जातं. यात भरपूर प्रमाणात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. यात फायटोन्यूट्रिएन्ट्स नावाचं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आढळतं. तसेच यात शरीर डिटॉक्स करणारे तत्व असतात. हिवाळ्यात बिटाचं सेवन केल्याने शरीरात आतून उष्ण राहतं आणि तुम्हाला एनर्जी मिळते. 

हिवाळ्यात बीट खाण्याचे फायदे

बॉडी डिटॉक्स

बिटाचा ज्यूस बॉडी डिटॉक्स ड्रिंक म्हणूनही ओळखला जातो. याने लिव्हरचे सेल्स उत्तेजित होतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदतही मिळते. इतकंच नाही तर यातील अनेक तत्व शरीरात फॅटी अॅसिड जमा होऊ देत नाही. तसेच याच्या ज्यूसच्या सेवनाने लिव्हर डॅमेजचा धोकाही कमी होतो.

इम्यूनिटी वाढते

हिवाळ्यात ज्या लोकांची इम्यूनिटी कमजोर असते, ते सगळ्यात आधी आजारी पडतात. तुम्ही हिवाळ्यात बिटाचं सेवन करून तुमची इम्यूनिटी बूस्ट करू शकता. यात बिटेन, फॉलिक अ‍ॅसिड, पोटॅशिअम, आयर्न असे अनेक पोषक तत्व असतात, जे शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासूनही बचाव करतात.

हृदयासाठी फायदेशीर

एक्सपर्ट सांगतात की, बिटाचा ज्यूस प्यायल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. हृदय निरोगी राहण्यासाठी बीपी कंट्रोलमध्ये राहणं अधिक फायदेशीर असतं. त्याशिवाय बिटाचं सेवन केल्याने शरीरावरील जखमा लवकर भरण्यासही मदत मिळते. 

कोलेस्ट्रॉल कंट्रोल राहतं

बिटामध्ये आढळणाऱ्या अनेक पोषक तत्वांमुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. बॅड कोलेस्ट्रॉल कमी झाल्यावर रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोकाही कमी होतो. तसेच अनेक हृदयरोगांचा धोकाही कमी होतो.

वजन नियंत्रित राहतं

बिटाच्या ज्यूसमध्ये कॅलरी फार कमी असतात आणि फॅटही नसतं. त्यामुळे याच्या नियमित सेवनाने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. 

सूज कमी होते

बिटाच्या ज्यूसमध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, ज्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत मिळते. याच्या नियमित सेवनाने इन्फ्लेमेटरी डिजीजसोबत लढण्यासही मदत मिळते.

Web Title: Amazing health benefits of eating beetroot in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.