सलाद म्हणून करू शकता केल भाजीचं सेवन, फायदे वाचून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 12:37 PM2024-11-05T12:37:26+5:302024-11-05T12:38:27+5:30

Health Benefits Of Kale : अनेक हेल्थ एक्सपर्ट्स या भाजीचं नियमित सेवन करण्याचा सल्ला देतात. कारण यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.

Amazing health benefits of eating this Kale green vegetable | सलाद म्हणून करू शकता केल भाजीचं सेवन, फायदे वाचून व्हाल अवाक्!

सलाद म्हणून करू शकता केल भाजीचं सेवन, फायदे वाचून व्हाल अवाक्!

Health Benefits Of Kale : केल ही एक पालेभाजी असून ही फारच पौष्टिक असते. अलिकडच्या काही वर्षांमध्ये या भाजीचं सेवन भरपूर वाढलं आहे. लोक या भाजीचं सेवन सलादच्या रूपात अधिक करतात. अनेक हेल्थ एक्सपर्ट्स या भाजीचं नियमित सेवन करण्याचा सल्ला देतात. कारण यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. या भाजीच्या सेवनाने शरीराला काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.

१) भरपूर न्यूट्रिएंट्स 

केल भाजीमध्ये अनेक पोषक तत्व असतात, ज्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम यांचा समावेश आहे. तसेच केलमध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात आढळतात. 

२) हृदयासाठी फायदेशीर

केळमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, जे कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवतं. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो. केलमध्ये सॉल्यूएबल आणि इनसॉल्यूएबल दोन्ही प्रकारचे फायबर आढळतात.

३) अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स

केलमध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. ज्यात क्वेरसेटिन आणि केम्पफेरोल यांचाही समावेश आहे. यांच्या मदतीने शरीरातील ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज कमी करण्यास मदत मिळते. या तत्वामुळे जुने आजारही कमी केले जाऊ शकतात.

४) हाडे होतील मजबूत

केलमध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. हे तत्व हाडांसाठी खूप फायदेशीर असतं. केलने अशा लोकांना अधिक फायदा मिळतो ज्यांना लॅक्टोज इन्टॉलरेन्स आहे म्हणजे जे डेअरी उत्पादनाचं सेवन करू शकत नाहीत. केल कॅल्शिअमचं शोषण करण्यास मदत करतं. ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

5) कॅन्सरपासून बचाव

अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, केलमधील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि फायटोकेमिकल्समुळे कॅन्सरसारख्या आजारांपासूनही बचाव होऊ शकतो. यात ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि कोलन कॅन्सर यांचा समावेश आहे. मात्र, याबाबत आणखीही रिसर्च करण्याची गरज आहे. 

Web Title: Amazing health benefits of eating this Kale green vegetable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.