लीची सारखं दिसतं हे फळ; शरीराला देतं बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 03:41 PM2019-04-01T15:41:56+5:302019-04-01T15:42:18+5:30
सर्व फळं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. परंतु तुम्ही कधी रामबुतान फळाबाबत ऐकलं आहे का? फार कमी लोकांना या फळाबाबत माहीत आहे. हे फळ दिसण्यासाठी लीचीप्रमाणे असतं.
सर्व फळं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. परंतु तुम्ही कधी रामबुतान फळाबाबत ऐकलं आहे का? फार कमी लोकांना या फळाबाबत माहीत आहे. हे फळ दिसण्यासाठी लीचीप्रमाणे असतं. यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी, कॉपर, प्रोटीन, आयर्न आढळून येतं. त्याचबरोबर 100 ग्रॅम रामबुतान फळांमध्ये फक्त 84 कॅलरी आढळून येतात. याव्यतिरिक्त या फळांमध्ये अॅन्टीऑक्सिडंट गुण असतात. जे शरीरातून फ्री रॅडिकल्स बाहेर काढण्यासाठी मदत करतात. या फळाचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजारांपासून सुरक्षित राहता येतं.
हे आहेत रामबुतान फळाचे फायदे :
हाडं मजबूत करण्यासाठी
रामबुतान फळांमध्ये मुबलक प्रमाणात फॉस्फरस असतं. जे हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. याच्या सेवनाने बराच वेळ हाडं मजबूत राहण्यास मदत होते.
डायबिटीजसाठी फायदेशीर
चीनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, या फळासोबतच याची सालही आरोग्यासाठी गुणकारी ठरते. याच्या सालीमध्ये अॅन्टी-डायबिटिक गुणधर्म आढळून येतात. जे डायबिटीजसारख्या आजारांमध्ये फायदेशीर ठरतात.
त्वचेसाठी फायदेशीर
रामबुतान फळांच्या बीया त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. यांच्या बीयांपासून तयार करण्यात आलेली पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील डाग दूर होतात. त्याचबरोबर त्वचेवर उजाळा येतो. ही फळं त्वचेला हायड्रेट करण्याचं काम करतात. दररोज चेहऱ्यावर या फळाच्या बीयांपासून तयार केलेली पेस्ट लावल्याने त्वचा कोमल आणि मुलायम होते. त्यचबरोबर बराच वेळापर्यंत त्वचेवर वाढत्या वयाची लक्षणं येत नाहीत.
पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी
रामबुतान फळामध्ये अस्तित्वात असलेलं फायबर पचनक्रिया सुधरवण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे बद्धकोष्टाची समस्या दूर होते. यामध्ये अस्तित्वात असलेली अॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म आतड्यांमधील बॅक्टेरिया नष्ट करतात.
कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी
अनेक गुणधर्म असलेलं रामबुतान फळामध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. जे कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी मदत करतात. यामध्ये अस्तित्वात असणारं व्हिटॅमिन-सी शरीरामध्ये अस्तित्वात असणारे फ्री रॅडिकल्स नष्ट करून कॅन्सरपासून बचाव करतात. एका सशोधनानुसार, रामबुतान फळांची साल शरीरातील कॅन्सरच्या पेशी तयार होण्यापासून रोखतात. लिव्हर कॅन्सरवरही ह फळं अत्यंत फायदेशीर ठरतं.
टिप : वरील सर्व बाबी आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नसून कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं.