आता कापूसही खाता येणार; कापसाच्या खाता येणाऱ्या व्हरायटीचा शोध!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 10:47 AM2018-10-18T10:47:58+5:302018-10-18T10:48:17+5:30
मंगळवारी यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरने कॉटन प्लांटच्या बायोटेक व्हर्जनला कमर्शलाईज करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.
अमेरिकेतील लोक आता लवकरच कॉटन म्हणजेच कापूस खाणे सुरु करतील कारण कॉटनची एक खाता येणारी व्हरायटी लवकरच बाजारात दाखल होणार आहे. मंगळवारी यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरने कॉटन प्लांटच्या बायोटेक व्हर्जनला कमर्शलाईज करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. टेक्सस ए अॅन्ड एम यूनिव्हर्सिटीनुसार, या प्लांटची खासियत ही आहे की, याच्या बिया खाता येतात. या यूनिव्हर्सिटीने कॉटनची ही प्रजाती दोन दशकांआधी डेव्हलप केली होती.
असे असले तरी यूएस फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनची परवानगी मिळणे अजून बाकी आहे. यूनिव्हर्सिटीनुसार, या विभागाची परवानगी काही दिवसांनी मिळेल. त्यानंतर शेतकरी खाण्यासाठी आणि कपड्यांसाठी दोन्हींसाठी कापसाचं उत्पादन घेऊ शकतील.
टेक्सस ए अॅन्ड एम यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक किर्ती राठोड यांनी या प्रोजेक्टवर २३ वर्षांआधी काम सुरु केलं होतं आणि त्यांना या प्लांटमध्ये टॉक्सिन निर्माण करणाऱ्या जीन्सना कसे रोखले जाऊ शकेल, याचा शोध लागला. हे तत्व गॉसिपॉल नावाने ओळखले जातात. हे जीन झाडांचा किटकांपासून बचाव करतात. पण यामुळे कॉटन सीड जनावरांच्या आणि मनुष्यांच्या खाण्या लायक राहत नाहीत.
कॉटन इनकॉर्पोरेटेडचे उपाध्यक्ष काटर यांनी सांगितले की, या प्लांटला व्यावसायिक दृष्टीकोनातून उगवण्यासाठी बराच वेळ लागेल. कारण बियाण्यांची पुरवठा पुढील सीझनपासून वाढवावा लागेल. यासाठी रिसर्च, मार्केटिंग आणि पैशांचीही गरज असेल.
काटर यांनी पुढे सांगितले की, या कॉटन सीड्समध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. ६०० मिनियन लोकांची दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी जगभरात उगवल्या जाणाऱ्या कॉटनला खाण्याच्या व्हेरायटीसोबत रिप्लेस करावं लागेल.
याची न्युट्रिशनल व्हॅल्यू अक्रोड आणि बदामा इतकीच असते. राठोड यांच्यानुसार, प्रोटीन काढून याचं पावडरही तयार केलं पाहिजे. जेणेकरुन एनर्जी बार्स आणि कणकेतही मिश्रित करता येईल.