नेहमीचा ठेचा सोडा...बनवा आवळ्याची 'ही' तोंडाला पाणी सोडणारी चटपटीत चटणी; जाणून घ्या रेसिपी! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 10:48 AM2024-10-26T10:48:44+5:302024-10-26T10:49:22+5:30

Amla Chutney Recipe : तिखट-आंबट आवळ्याची चटणी जेवणाची टेस्ट तर वाढवतेच, सोबतच शरीरालाही अनेक फायदे देते. अशात आज आम्ही तुम्हाला आवळ्याची खास चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

Amla chutney recipe will boost your immunity, know how to make it | नेहमीचा ठेचा सोडा...बनवा आवळ्याची 'ही' तोंडाला पाणी सोडणारी चटपटीत चटणी; जाणून घ्या रेसिपी! 

नेहमीचा ठेचा सोडा...बनवा आवळ्याची 'ही' तोंडाला पाणी सोडणारी चटपटीत चटणी; जाणून घ्या रेसिपी! 

Amla Chutney Recipe : आवळा एक असं फळ आहे ज्यात अनेक पोषक तत्व असतात. अनेक समस्या दूर करण्यासाठी आवळ्याचा फार पूर्वीपासून आयुर्वेदात वापर केला जातो. आवळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि इतर पोषक तत्व असतात. जे शरीराची इम्यूनिटी वाढवतात. आवळ्याचं लोक वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करतात. यातील एक पद्धत म्हणजे आवळ्याची चटकदार चटणी. तिखट-आंबट आवळ्याची चटणी जेवणाची टेस्ट तर वाढवतेच, सोबतच शरीरालाही अनेक फायदे देते. अशात आज आम्ही तुम्हाला आवळ्याची खास चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य

250 ग्रॅम आवळे

एक चमचा धणे 

1 चमचा जिरे

उडीद डाळ अर्धा चमचा

1 चमचा तूप

5 ते 6 लसणाच्या कळ्या

5 ते 6 हिरव्या मिरच्या

5 ते 6 वाळलेल्या लाल मिरच्या

मीठ टेस्टनुसार

पाणी

कोथिंबीर

कशी बनवाल?

- आवळ्याची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी ताजे आवळे घ्या आणि 2 ते 3 पाण्याचे चांगले धुवा. नंतर त्यांचे छोटे छोटे तुकडे करा.

- आता एक फॅन गॅसवर कमी आसेवर ठेवा आणि यात 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा उडीद डाळ आणि एक चमचा तूप टाकून सगळ्या गोष्टी चांगल्या भाजून घ्या.

- या गोष्टी थोड्या भाजल्यानंतर यात लसणाच्या कळ्या, हिरवी मिरटी आणि लाल मिरटी टाका. या गोष्टीही हलक्या भाजू द्या.

- जेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने भाजल्या जातील तेव्हा त्यात आवळ्यांचे तुकडे टाका. नंतर टेस्टनुसार मीठ आणि थोडं पाणी टाका. त्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजू द्या.

- जेव्हा आवळे अर्धे शिजतील तेव्हा यातील कडवटपणा दूर होईल. अर्धे शिजल्यानंतर हे सगळं एका प्लेटमध्ये काढा आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाका.

- यात कोथिंबीर, थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्या. हवं तर यात तुम्ही थोडं मोहरीचं तेल आणि लिंबाचा रसही टाकू शकता. तुमची चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही चपाती, पराठा, कचोरी कशासोबतही खाऊ शकता.

Web Title: Amla chutney recipe will boost your immunity, know how to make it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.