कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच कॅन्सरपासूनची बचाव करतो आवळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 11:39 AM2018-09-27T11:39:35+5:302018-09-27T11:39:54+5:30
आवळा हा आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायद्याचा ठरतो. न्यूट्रिशन एक्सपर्टनुसार, एका आवळ्यामध्ये दोन संत्री इतकं व्हिटॅमिन सी असतं.
आवळा हा आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायद्याचा ठरतो. न्यूट्रिशन एक्सपर्टनुसार, एका आवळ्यामध्ये दोन संत्री इतकं व्हिटॅमिन सी असतं. त्यासोबतच आवळ्यामध्ये पोलीफेनॉल्स, आयर्न, झिंक, कॅरोटीन आणि फायबर हे तत्व भरपूर प्रमाणात असतात. तसेच व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शिअम, अॅंटीऑक्सिडेंट्सही यात असतात. त्यासोबतच आवळ्यामध्ये असलेल्या नियोपाइनफ्राइन नावाच्या तत्वामुळे मूडशी संबंधित प्रक्रियांवरही नियंत्रण ठेवता येतं. चला जाणून घेऊ आवळ्याचे आणखी काही खास फायदे
डोळ्यांसाठी फायदेशीर
आवळ्यामध्ये असलेल्या अॅंटीऑक्सिडेंट्स रेटिनाला ऑक्सिडाइज होण्यापासून वाचवतो. याच्या नियमीत सेवनाने मोतीबिंदू आणि रात आंधळेपणा या समस्याही दूर ठेवता येतात.
पचनक्रिया चांगली राहते
आवळ्यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असतं. आवळा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक स्वच्छ ठेवतो आणि शरीरातील टॉक्सिन दूर करतो. तसेच याने पचनक्रियाही चांगली ठेवण्यात मदत मिळते. याने अॅसिडिटीची समस्याही दूर होते.
कॅन्सरपासून बचाव
आवळ्यामध्ये अॅंटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतं. याने कार्सिनोजेनिक पेशींची वाढ थांबवली जाते आणि कॅन्सरपासून बचाव होतो.
वजन कमी करण्यात मदत
आवळा खाल्याने शरीरात प्रोटीनचं प्रमाण वाढतं आणि नायट्रोजनचं संतुलन कायम राहतं. याने शरीरातील फॅट बर्न होतात आणि वजन कमी करण्यात मदत मिळते.
सुरकुत्या दूर करण्यासाठी
आवळा रक्तपेशींमध्ये फॅट जमा होऊ देत नाही. याच्या नियमीत सेवनाने चेहऱ्यावर पिंपल्स आमि सुरकुत्या येण्याची समस्याही दूर होते.