सफरचंद तुम्ही आवडीने खात असाल, पण यात विष असतं हे माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 12:35 PM2019-12-27T12:35:13+5:302019-12-27T12:36:52+5:30

सफरचंद हे जगातलं सर्वात हेल्दी फळ मानलं जातं. पण हे पौष्टिक फळ आपल्या आरोग्याला नुकसानही पोहोचवू शकतं.

Apple seeds can be poisonous! Here’s what happens when you eat them | सफरचंद तुम्ही आवडीने खात असाल, पण यात विष असतं हे माहीत आहे का?

सफरचंद तुम्ही आवडीने खात असाल, पण यात विष असतं हे माहीत आहे का?

Next

सफरचंद हे जगातलं सर्वात हेल्दी फळ मानलं जातं. पण हे पौष्टिक फळ आपल्या आरोग्याला नुकसानही पोहोचवू शकतं. मुळात सफरचंद नाही तर सफरचंदातील बीया आपला जीव घेण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. ते कसं हेच जाणून घेऊया....

सफरचंदाच्या बीयांमध्ये अ‍ॅमिग्दालीन हे एक तत्व असतं. हे जेव्हा मनुष्याच्या शरीरातील पचनक्रियेसंबंधी एंजाइमच्या संपर्कात येतं तेव्हा सायनाइड रिलीज करू लागतं. मुळातच सफरचंदाच्या बियांचं कोटिंग फार टणक असतं. त्यामुळे या बीया सहजपणे फोडणं शक्य नसतं. अ‍ॅमिग्दालीनमध्ये सायनाइड आणि साखर असते आणि जेव्हा आपण या बीया गिळंकृत करतो तेव्हा हायड्रोजन सायनाइडमध्ये रूपांतरित होतं.

श्रीदेवीच्या 'मॉम' या सिनेमातही तुम्ही पाहिलं असेल की, तिच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांचा खात्मा करण्यासाठी तिने सफरचंदाच्या बियांचाच वापर केला होता. या सायनाइडमुळे केवळ तुम्ही आजारीच होणार नाही तर तुमच्या जीवालाही धोका होऊ शकतो. तसेच या बीया कमी प्रमाणातही कुणाच्या शरीरात गेल्या तर त्या व्यक्तीला डोकेदुखी, उलटी, पोट घट्ट होणे आणि कमजोरी अशा समस्या होऊ शकतात.

त्यामुळे सफरचंद खाण्याआधी त्यातील बीया काढून टाका. जेणेकरून याचे फायदे होण्याऐवजी नुकसान होऊ नये. तसेच तुम्ही जर न चावता बीया पोटात गेल्या तर घाबरण्याची गरज नाही. पण जर बीया तुम्ही चावल्या तर पोटात सायनाइड रिलीज होऊन तुम्ही आजारी पडू शकता. 

कसं काम करतं सायनाइड?

सायनाइड एक कुख्यात विष आहे. सामूहिक आत्महत्या आणि केमिकल युद्धादरम्यान याने अनेकांना जीव घेतल्याचा मोठा इतिहास आहे. याने ऑक्सिजन पुरवठ्यात अडचण निर्माण होते आणि शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया थांबतात. सायनाइडमुळे हृदय आणि मेंदूची क्रिया थांबते. यात तुमचा मृत्यूही होऊ शकतो. 

जर जास्त प्रमाणात सायनाइडचं सेवन केलं गेलं तर व्यक्तीला लगेच श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. हृदयाचे धडधड वाढतते, ब्लड प्रेशर लो होतं आणि व्यक्ती बेशुद्ध होतो. २०० सफरचंदाच्या बीया व्यक्तीच्या शरीरात विष तयार करण्यासाठी पुरेशा आहेत.


Web Title: Apple seeds can be poisonous! Here’s what happens when you eat them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.