डायजेस्टिव्ह बिस्किट्स खरचं हेल्दी आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 04:18 PM2018-12-13T16:18:18+5:302018-12-13T16:18:39+5:30

सध्या लोक आरोग्याविषयी जागरूक होताना दिसत आहेत. त्यामुळेच बाजारात मिळणाऱ्या किंवा घरी जेवण तयार करताना वापरण्यात येणाऱ्या पदार्थांबाबत जास्त काळजी घेत आहेत.

Are digestive biscuits really healthy | डायजेस्टिव्ह बिस्किट्स खरचं हेल्दी आहेत का?

डायजेस्टिव्ह बिस्किट्स खरचं हेल्दी आहेत का?

googlenewsNext

सध्या लोक आरोग्याविषयी जागरूक होताना दिसत आहेत. त्यामुळेच बाजारात मिळणाऱ्या किंवा घरी जेवण तयार करताना वापरण्यात येणाऱ्या पदार्थांबाबत जास्त काळजी घेत आहेत. अनेक लोकं ऑर्गेनिक फूडचा आधार घेताना दिसतात. एवढचं नव्हे तर चहासोबत खाण्यात येणाऱ्या बिस्किट्सबाबतही लोकं फार काळजी घेताना दिसतात. सध्या लोकांमध्ये डायजेस्टिव्ह बिस्किट्सची क्रेझ वाढताना दिसत आहे. हे बिस्किट्स नॉर्मल बिस्किट्सपेक्षा जास्त हेल्दी समजले जातात. परंतु हे बिस्किट्स खरचं आरोग्यदायी ठरतात का? 

हेल्दी की अनहेल्दी 

सामान्य बिस्किट्सच्या तुलनेत डायजेस्टिव्ह बिस्किट्स तयार करण्यासाठी जास्त हेल्दी पदार्थांचा वापर केला जातो. यामध्ये प्रोटीन आणि जास्त फायबर आढळून येतात. जे शरीरासाठी चांगले असतात. दरम्यान यामध्ये साखर, मीठ, अनहेल्दी फॅट्स आणि रिफाइन्ड फ्लोरच्या रूपामध्ये कॅलरीजही असतात. 

बिस्किट्स जास्त काळ टिकण्यासाठी आणि त्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी यांनी प्रोसेस करण्यासोबतच यांमध्ये प्रिजरवेटिव्ह टाकण्यात येतात. यांमध्ये हाय सोडियम कॉन्टेटही मिक्स करण्यात येतो. चार डायजेस्टिव्ह बिस्किट्समध्ये एक पॅकेट बटाट्यांएवढं सोडिअम वापरलं जातं. 

डायजेस्टिव्ह बिस्किट्समध्ये 10 टक्के सॅच्युरेटेड फॅट्स असतात. जे शरीरासाठी घातक असतात. तसेच या बिस्किट्समध्ये कोणत्याही प्रकारचे व्हिटॅमिन्सही नसतात. त्यामुळे हे बिस्किट्स खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसान पोहोचवणारे ठरते. 

बिस्किट्सऐवजी काय खावं?

डायजेस्टिव्ह बिस्किट्स ऐवजी तुम्ही मुठभर ड्राय फ्रुट्सचं सेवन करा. यामुळे दिवसभर ऊर्जा मिळण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर तुम्ही मिक्स सीड्स, भाजलेले चणे आणि मखाने खाऊ शकता. जर तुम्हाला बिस्किट्स खायचे असतील तर नाचणीचे बिस्किट्स खावू शकता. जे शरीरासाठी आरोग्यदायी ठरतात. 

Web Title: Are digestive biscuits really healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.